WhatsApp Tips And Tricks: व्हॉट्स अॅप हे मेसेजिंग अॅप आता अनेकांसाठीच दैनंदिन जीवनातील एक भाग. बहुविध कारणांसाठी या अॅपचा वापर सर्रास केला जातो. चॅटिंग, ऑडियो आणि व्हिडीओ कॉल अशा अनेक सुविधा या अॅपच्या माध्यमातून युजर्सना दिल्या जातात. क्षणार्धात माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी या अॅपला अनेकांचीच पसंती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेसेजसोबतच या अॅपवर फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सेंड आणि फॉरवर्ड केले जातात. आता आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टपैकी किंवा मग आपल्या जवळच्या व्यक्तींपैकी कोणा एका व्यक्तीनं नेमकं कोणाला फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाठवले आहेत हेसुद्धा एक ट्रीक वापरत माहित करता येतं. यासाठी तुम्ही फक्त त्या व्यक्तीचा फोन हाती घेणं अपेक्षित आहे. 


Whatsapp ग्रुपमध्ये Add व्हायचं नाहीय? वापरा 'या' सोप्या Tricks


 


फोटो आणि व्हिडीओंची देवाणघेवाण नेमकी कशी आणि किती प्रमाणात होते हे जाणून घेण्यासाठी... 


- सर्वप्रथम व्हॉट्सअॅप सुरु करुन वरच्या बाजूला दिसणाऱ्या तीन टींबांवर क्लिक करा. 
- त्यानंतर इथे सेटिंग्जवर क्लिक करा. तिथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. 
- तिथे तुम्हाला स्टोरेज एँड डेटा अशा नावाचा एर पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. 
- त्यावर क्लिक केलं असता दिसणाऱ्या अनेक पर्यायांपैकी मॅनेज स्टोरेजवर क्लिक करा. 
- क्लिक करताच इथे तुम्हाला पूर्ण यादी दिसेल. त्यामध्ये सर्वप्रथम दिसणाऱ्या नावाच्या व्यक्तीलाच तुमच्या हाती असणाऱ्या फोनच्या व्हॉट्स अॅपमधून सर्वाधिक फोटो आणि व्हिडीओ पाठवण्यात आले असतील.