Whatsapp Tips And Tricks: Whatsapp या अॅपच्या उपलब्धतेमुळं अनेक माणसं जोडली गेली. मेसेजिंग आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या अॅपचा सर्रास वापर केला जातो. अनेकांच्या दैनंदिन जीवनात रोजच्या कामाचा बराचसा वाटाही याच अॅपनं उचलला आहे. Whatsapp आता अनेकांसाठी सवयीचाच भाग झाला आहे. पण, सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या या अॅपमुळं कित्येकदा अशी वेळही येते, जेव्हा ते वापरणाऱ्यांच्या नाकी नऊ येतात.
यामागे अनेक कारणं आहेत. पण, त्यापैकीच एक कारण म्हणजे Whatsapp ग्रुप. कित्येकदा गरजेच्या गोष्टींव्यतिरिक्तही अनेकदा Whatsapp ग्रुप तयार केले जातात आणि त्यामध्ये युजर्सना अॅड केलं जातं. बरं ग्रुप सोडला तर तिथे इतरांनाही त्याची माहिती झाल्यास प्रश्नांचा भडिमार होईल तो वेगळा या विचारानं आजमितीस असंख्य युजर्स अशाच काही निकामी ग्रुप्सचा भाग आहेत. पण, आता मात्र यापासून मोकळीक मिळणं शक्य होणार आहे. एक अशी ट्रीक आहे, ज्यामुळं तुम्हाला कोणीही ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. यासाठी सर्वप्रथम तुमचं व्हॉट्सअॅप अपडेट असणं गरजेचं आहे.
Whatsapp वर एक छोटी चूक तुम्हाला तुरुंगात पाठवू शकते...या चूका कधीही करु नका
- सर्वप्रथम Whatsapp सेटिंग्समध्ये जा.
- यामध्ये Account हा पर्याय निवडा.
- इथं तुम्हाला प्रायव्हसी, सिक्युरिटी, टू स्टेप वेरिफिकेशन असे पर्याय दिसतील.
- प्रायव्हसीवर क्लिक केलं असता, तुम्हाला ग्रुप्स हा पर्याय दिसेल.
- तिथेच तुम्हाला एवरीवन, माय कॉन्टॅक्ट्स आणि नोबडी असे पर्याय दिसतील.
- इथं डिफॉल्ट सेटिंगनुसार तुम्हाला एवरीवन हा पर्याय निवडून दिलेला असेल. याचा अर्थ तुम्हाला कोणीही ग्रुपमध्ये अॅड करु शकतं.
- इथं तुम्ही ही सेटिंग बदलून माय कॉन्टॅक्ट्स हा पर्याय निवडू शकता.
- हा पर्याय निवडताच ज्यांच्याकडे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तिच मंडळी तुम्हाला अमुक एका ग्रुपमध्ये अॅक करु शकतात.
- इथं Nobody हा पर्याय निवडला असता तुम्हाला कोणीही ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही.