WhatsApp : व्हॉट्सअॅप यूझर्ससाठी चिंताजनक बातमी, आताच व्हा सावध !
Whats App : व्हॉट्सअॅपमध्ये खतरनाक बग आलाय. सीईआरटीने या संदर्भात अलर्ट जारी केलाय.
मुंबई : Whats App News : व्हॉट्सअॅपमध्ये खतरनाक बग आलाय. सीईआरटीने या संदर्भात अलर्ट जारी केलाय. या खतरनाक बगमुळे डेटा लीक होण्याचा धोका आहे. ( WhatsApp users beware) या बगमुळे सायबर हल्लेखोर दूर राहूनचं तुमच्या फोनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करू शकतात. हा बग अँड्रॉईड आणि आयएसओ या दोन्ही व्हर्जनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करू शकतात.
व्हिडिओ कॉलद्वारे किंवा युझर्सना व्हिडिओ फाईल पाठवून हा मालवेअर इन्स्टॉल होऊ शकतो. हा मालवेअर डेटा लीक करतो. मोबाईल फोनद्वारे बँकिंग अॅप्स किंवा वॉलेट वापरण्याचं प्रमाण देशात प्रचंड वाढलंय. त्यावर थेट डल्ला या मालवेअरद्वारे मारण्याचा धोका आहे. ( WhatsApp users beware will be a costly mistake government given a warning )
WhatsApp मध्ये ‘या’ त्रुटी
SERT-In सल्लागारानुसार, व्हॉट्सअॅपच्या ( WhatsApp ) अँड्रॉइड आणि आयओएस आवृत्ती v2.22.16.12, iOS आवृत्ती v2.22.15.9,आयओएस बिझनेस आवृत्ती v2.22.16.12 आणि अँड्रॉइड बिझनेस आवृत्ती v2.22.16.12 वर अनेक त्रुटी सापडलया आहेत. या त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमचे व्हॉट्सअॅप हॅक करू शकतात. या त्रुटी हॅकर्सना व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे तुमच्या स्मार्टफोनवरील रिमोट कोड स्टॅब्लिस्ट करण्याची परवानगी देतात. हे टाळण्यासाठी व्हॉट्सअॅप यूजर्सनी आधी त्यांचे अॅप अपडेट करावे.
मोबाईल बँकिंग करत असाल तर ..
मोबाईल बँकिंग सिस्टीमला व्हायरसचा मोठा धोका निर्माण झालाय. सोव्हाबाबत एसबीआय, पीएनबी आणि कॅनरा बँकेने अलर्ट जारी केला आहे. आपल्या मोबाईलमधील व्हॅल्युएबल अॅक्सेस चोरी होऊ देऊ नका, ट्रस्टेड अॅप्स अधिकृत अॅप स्टोअरवरूनच डाऊनलोड करा असा इशारा या तीन बँकांना दिलाय. सोव्हा मालवेअरमुळे तुमचं खातं क्षणात रिकामं होऊ शकतं. हॅकिंग व्हायरसचा नवं व्हर्जन भारताच्या ब्लॅक मार्केटमध्ये पोहोचलं आहे. मोबाईल बँकिंग सिस्टीमला सोव्हा अँड्रॉईड ट्रोजन व्हायरसचा धोका आहे. या नव्या व्हायरसमुळे कोणत्याही मोबाईल बँकिंग सिस्टीमचा युझरनेम आणि पासवर्ड ह्रक करता येऊ शकतो. तो एकदा मोबाईलवर इन्स्टॉल झाला की तो डिलीटही करता येत नाही.