WhatsApp Tricks: असा बनवा स्वत:चा GIF व्हिडिओ
व्हॉट्सअपवर कसा तयार कराल जीआयएफ?
नवी दिल्ली : व्हॉट्सअप जगभरातील सर्वाधिक चर्चित असणारं इंस्टंट मेसेजिंग ऍप आहे. भारतात या मेसेजिंग ऍपचा मोठा बाजार आहे. व्हॉट्सअपवर आपण स्टिकर, इमोजी पाठवतो. जीआयएफही पाठवतो. पण तुम्हाला व्हॉट्सअपवर पर्सनलाइज्ड जीआयएफ पाठवण्याबाबत माहिती आहे का? आता स्टिकरप्रमाणे पर्सनलाइज्ड जीआयएफही पाठवता येऊ शकतात.
व्हॉट्सअपमध्ये कोणताही व्हिडिओ ट्रिम करुन त्याला जीआयएफमध्ये करता येऊ शकतं. हा जीआयएफ इतर कॉन्टॅक्टशीही शेअर करता येऊ शकतो. जाणून घ्या व्हॉट्सअप फिचरमध्ये पर्सनलाइज्ड जीआयएफ (WhatsApp Tricks) कसा तयार करतात...
जीआयएफ बनवण्यासाठी व्हॉट्सअप यूजरकडे सपोर्टेड व्हिडिओ फाइल आणि व्हॉट्सअपचं लेटेस्ट व्हर्जन असणं आवश्यक आहे.
व्हॉट्सअपवर कसा तयार कराल जीआयएफ
- व्हॉट्सअपमध्ये कोणताही चॅट विंडो ओपन करा
- त्यानंतर चॅटबॉक्समधल्या अटॅचमेंटवर क्लिक करा. जो व्हिडिओ पाठवायचा आहे तो व्हिडिओ सिलेक्ट करा.
- आता व्हिडिओ ट्रिम, टेक्स्ट, इमोजीचे पर्याय दिसतील
- व्हिडिओमधील जो भाग पाठवायचा आहे, तो भाग ट्रिम करा. त्यानंतर बाजूला GIF असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेअरवर क्लिक करा.
ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. जो व्हिडिओ पाठवायचा आहे तो सिलेक्ट करुन त्याला ट्रिम करुन जीआयएफ तयार होईल. या फिचरमध्ये जीआयएफ तयार केल्यानंतर, जीआयएफमध्ये इमोजी, टेक्स्ट आणि इतरही टूल्सचा वापर करु शकता.
गेल्या काही दिवसांपूर्वी व्हाट्सअपने Android बीटा वर्जन ऍपसाठी डार्क मोड सुरु केला. आता WhatsAppने iOSच्या बीटा व्हर्जन ऍपसाठी डार्क मोडचं अपडेट दिलं आहे. TestFlight बीटा प्रोग्राम यूजर्ससाठी WhatsAppच्या २.२०.३० वर्जनमध्ये डार्क मोड अपडेट मिळणार आहे.
WhatsApp dark mode ऍक्टिव्ह करण्यासाठी -
- 'Settings' वर क्लिक करा
- उजव्या हाताला वर तीन बिंदू दिसतील. त्यावर क्लिक करुन चॅट ऑप्शनवर क्लिक करा
- चॅटमध्ये 'Theme'ऑप्शनवर क्लिक करा
- त्यात डिफॉल्ट, लाइट आणि डार्क ऑप्शन मिळतील. त्यापैकी हवा तो ऑप्शन क्लिक करा.