मुंबई :  जगप्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नवनवीन फिचर्स अपडेत येत असतात. असचं नवीन अपडेट घेऊन आता पून्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅप घेऊन आले आहे. हे नवीन अपडेट युझर्सना चांगलेच महागात पडू शकते. कारण नवीन फिचरमध्ये व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी आता पैसे मोजावे लागणार आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप युझर्सना मोठा फटका बसणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाबेटाइन्फो या व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर्सबाबत माहिती देणाऱ्या कंपनीनूसार, WhatsApp सब्सक्रिप्शन-आधारित मॉडेलवर काम करत आहे. यामुळे युजर्सना अनेक फीचर्स वापरण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. मात्र हे प्रत्येक युझर्ससाठी नसणार आहे.   


सब्सक्रिप्शन मॉडेलची WhatsApp बिझनेससाठी चाचणी केली जात आहे.सब्सक्रिप्शन मॉडेलबद्दल एप्रिलमध्ये पहिल्यांदा अहवाल आला होता. सब्सक्रिप्शन प्लॅनबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. खास सूत्रांनूसार, सब्सक्रिप्शन घेतल्यानंतर, व्हॉट्सअॅप बिझनेस वापरकर्त्यांना अतिरिक्त वैशिष्ट्ये दिली जातील. यामध्ये जास्तीत जास्त 10 उपकरणे लिंक करण्याची सुविधाही असू शकते.


अँड्रॉइड, डेस्कटॉप आणि आयओएससाठी व्हॉट्सअॅप प्रीमियमची चाचणी केली जात आहे. हे फक्त Whatsapp Buisiness साठी असेल आणि ते ऐच्छिक असेल. व्हॉट्सअॅप बिझनेस प्रोफाईलचे मालक देखील व्हॉट्सअॅप प्रीमियमची निवड रद्द करू शकतात आणि सध्याची आवृत्ती सतत वापरू शकतात. 


दरम्यान अद्याप या फिचर्सवर काम सूरू आहे. लवकरच हे काम पूर्ण झाल्यावर व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन फिचर बाजारात आणणार आहे. याचा Whatsapp Buisiness युझर्सना किती फायदा होतो हे पहावे लागेल.