तुमचं व्हॉट्सअप होणार बंद? या यादीत तुमचा मोबाईल तर नाही?
Whatsapp तुमच्या फोनचा निरोप घेणार? या यादीमध्ये तुमचा मोबाईल तर नाही पाहा व्हिडीओ
मुंबई: आता प्रत्येक व्हॉट्सअप युजरने पाहावी अशी बातमी आहे. तुमच्या फोनवरील व्हॉट्सअपची सेवा कधीही बंद होऊ शकते. व्हॉट्सऍप कंपनीनं अलिकडेच एक नवी पॉलिसी जाहीर केली आहे. त्यामुळे अनेकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
स्मार्टफोन वापरणारी अशी एकही व्यक्ती सापडणार नाही जी व्हॉट्सअप वापरत नसेल. व्हॉट्सअप म्हणजे आपल्या जगण्याचा एक भाग बनला आहे. पण जरा थांबा, कारण तुमच्या मोबाईलवर फार काळ व्हॉट्सअपची सुरू राहिलच असं नाही. कारण व्हॉट्सअपनं काही जुन्या स्मार्टफोनचा सपोर्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील दोन महिन्यात जवळपास 40हून अधिक स्मार्टफोनवरील व्हॉट्सअपची सेवा बंद केली जाणार आहे. व्हॉट्सअपने यावर्षी अनेक नवीन फीचर्स ऍपमध्ये जोडले आहेत. ऍप सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीनं जुन्या स्मार्टफोन्सचा निरोप घेण्याचं ठरवलं आहे.
तुमचा व्हॉट्स अप बंद होणार ?
त्यानुसार एन्ड्रॉइड OS 4.1 आणि त्यानंतरच्या स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअप सुरू राहिल. iOS 10 आणि त्यानंतरचे आयफोन्स, काही निवडक KaiOS 2.5.1 आणि त्यानंतरचे स्मार्टफोन्स, ज्यात JioPhone आणि JioPhone 2 चा समावेश आहे. अशा फोन्समध्ये व्हॉट्सअपची सेवा सुरू राहिल. मात्र तब्बल 43 डिव्हायसेसवर व्हॉट्सअप वापरता येणार नाही.
तुमचा फोन या यादीत असेल तर तुम्हाला त्या फोनवर व्हॉट्सऍप वापरता येणार नाही. एकदा का व्हॉट्सऍपने सपोर्ट बंद केला तर तुमची चॅट हिस्ट्री देखील तुम्हाला वापरता येणार नाही. त्यामुळे आजच आपला फोन तपासून घ्या. तुमचा फोन आऊटडेटेड सिस्टमवर काम करत असेल तर नवीन स्मार्टफोन घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.