गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातामुळे (Road Accidents) सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (tata sons cyrus mistry death) यांच्या अपघाती मृत्यूनंतर गाडीतील सिटबेल्ट (seat belt) आणि एअर बॅगबाबत (air bag) जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र वाहनांच्या अन्य भागांबाबतही जागरुकता बाळगणं तितकचं महत्त्वाचं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणतंही वाहन चालवताना टायरसारख्या (Car Tyre) महत्त्वाच्या भागांची निगा राखणं तितकचं महत्त्वाचं आहे. योग्यवेळी त्या जागी नवे पार्टस लावणेही गरजेचं असतं. मात्र काही जण हे टाळतात आणि अपघाताला (Accidents) बळी पडतात.


यामध्ये वाहनाचे टायरही तितकेच महत्त्वाचे आहेत.प्रत्येक वाहनाच्या टायरची एक मर्यादा असते. त्यानंतर ते बदलले नाहीत तर तुम्ही वाहनाच्या सुरक्षेसोबत स्वतःच्या आयुष्याशीही खेळत असता. वाहनाच्या टायरचे आयुष्य सामान्यतः त्याच्या वापरावर अवलंबून असते.मात्र काही खुणा आणि पॉइंटर आहेत ज्याद्वारे आपण वाहनाचे टायर  बदलणे आवश्यक आहे की नाही जाणून घेऊ शकता.


गाडीचे टायर कधी बदलायचे?


कारच्या टायरच्या सरासरी आयुष्य हे 30 हजार ते 50 हजार किलोमीटरपर्यंत असते. त्यानंतर गाडीचा टायर बदलला पाहिजे.आपण टायरमध्ये दिलेल्या इंडिकेटरद्वारे गाडी किती चालली त्याची अचूक वेळ देखील शोधू शकता.


टायरवर सहा ठिकाणी बाणाचे निशाण असते. बाणाच्या निशाणासमोर खाचे असतात.या खाच्यांमध्ये ट्रेड विअर इंडिकेटर (TWI) असतो. नवीन टायरमध्ये त्याची खोली 8 मिमी असते आणि 80% वापरानंतर ती 1.6 मिमी होते. जेव्हा रस्त्याच्या संपर्कात असलेला भाग घासून सपाट होऊ लागतो आणि त्या इंडिकेटरला स्पर्श करतो, तेव्हा टायर बदलण्याची वेळ आलेली असते. 



दरम्यान, याव्यतिरिक्त टायर कुठे फाटलेला असेल तर तो बदलण्याची वेळ आलेली असते. तसेच टायरमध्ये अर्ध्या सेंटीमीटरपेक्षा जास्तीचा खड्डा झालेला असेल तरीही तो बदलायला हवा.