मुंबई: नुकतंच Windows 11 ची घोषणा करण्यात आली आहे. नोव्हेंबरपर्यंत ते बाजारपेठेत उपलब्धही होणार आहे. मात्र तुमच्या पीसी किंवा लॅपटॉपमध्ये तुम्हाला हे नवीन व्हर्जन डाऊनलोड किंवा अपडेट करता येणार की नाही हे शोधण्यासाठी खास टूल आहे. ज्या द्वारे तुम्ही काही मिनिटांत चेक करू शकता की तुमच्या लॅपटॉप किंवा पीसीमध्ये Windows 11 अपडेट करता येणार की नाही. 


कसं शोधायचं आपल्या पीसीवर windows-11 व्हर्जन चालणार की नाही?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

-पीसीमध्ये क्रोम सुरू करा. त्यानंतर http://www.microsoft.com/en-in/windows/windows-11 या वेबसाईटला भेट द्या
- Check for Compatibility हा पर्याय निवडा. त्यानंतर तुम्हाला डाऊनलोडचा पर्याय मिळेल. त्या टूलवर क्लिक करा आणि त्यानंतर डाऊनलोड सेटअप असं म्हणा. 
- डाऊनलोड पूर्ण होईपर्य़ंत थांबा. ते डाऊनलोड झालं की Open Windows PC Health Check हा पर्याय निवडा. त्यानंतर फिनिश पर्याय येईल. 
- सॉफ्टवेअरवर Check Now असा पर्याय येईल. तो निवडल्यानंतर तुमचा पीसी किंवा लॅपटॉपमध्ये अपडेट करता येणार की नाही हे समजणार आहे.


windows 11 आपल्या पीसी किंवा लॅपटॉपला घेण्यासाठी या गोष्टी असं आवश्यक


यासाठी आपल्या पीसीवर काही मिनिमम स्टिस्टिम रिक्वायरमेंट असणं देखील गरजेचं असणार आहे. त्या कोणत्या आहेत जाणून घेऊया. 
- विंडोज 11 तुमच्या पीसी किंवा लॅपटॉपला हवा असेल तर तुमच्या प्रोसेसरमध्ये या 3 गोष्टी असायलाच हव्यात
 पहिलं म्हणजे दोन किंवा 2 पेक्षा जास्त कोअर्स असायला हवे. दुसरं 1 गिगा हर्ट्स किंवा त्या पेक्षा जास्त वेगवान प्रोसेसर हवा. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 64 बिट सपोर्ट असायला हवा.
- तुमच्या लॅपटॉप किंवा पीसीची RAM 4 किंवा 4 GB पेक्षा जास्त असायला हवी.
64 जीबी जागा तुमच्या पीसी, लॅपटॉपला रिकामी असायसला हवी. तरच तुम्हाला विंडोज 11 घेता येऊ शकतं.
- जर तुम्हाला विंडोज 11चे ग्राफिक्स संदर्भातील फीचर्स वापरायचे असतील तर तुमचे ग्राफिक्स कार्ड 'डिरेक्ट एक्स 12' सपोर्टेबल हवं आणि तुमच्या लॅपटॉप किंवा डिस्प्लेची साइज 9 इंचापेक्षा जास्त हवी.


तुमच्याकडे विंडोज 10 आहे तर विंडोज 11 घेण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी काही पैसे भरावे लागणार का? तर यासंदर्भात कंपनीकडून मिळेल्या माहितीनुसार ज्यांच्याकडे विंडोज 10 ची ओरिजनल की आहे त्यांना विंडोज 11चा फ्री अपडेट करता येणार आहे.