नवी दिल्ली : सध्याच्या काळात प्रत्येकाच्याच हातात आपल्याला स्मार्टफोन पहायला मिळतो. स्मार्टफोनचं वेड युजर्सला इतकं लागलं आहे की त्यामुळे अनेकदा अपघात झाल्याचंही समोर आलं आहे. आता असाच एक प्रकार समोर आला आहे.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मार्टफोनचं व्यसन असणाऱ्यांसोबत अनेक अपघात होत असतात. तुम्हालाही स्मार्टफोनचं वेड आहे तर मग हा व्हिडिओ नक्की पाहा आणि आपली सवय बदला. अन्यथा तुम्हाला पश्चाताप होऊ शकतो.


स्मार्टफोनवर बोलता-बोलता कधी कुणी गाडीला धडकतं, कुणी पायऱ्यांवरुन कोसळतं तर कुणी पाय घसरुन पडतं. आता असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. 


या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, एक महिला मोबाईल फोनवर बोलत मॉलमध्ये प्रवेश करते. तिचं संपूर्ण लक्ष हे मोबाईलवर बोलण्यात असतं आणि त्यानंतर तिच्यासोबत घडतो हास्यास्पद प्रकार. तुम्हीही पाहा हा व्हिडिओ...



फोनवर बोलण्याच्या नादात ही महिला थेट चालत येते आणि समोर असलेल्या पाण्यामध्ये पडते.


हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून आतापर्यंत हजारो नागरिकांनी पाहिला आहे.