Car Parking चं टेन्शन संपलं! विना ड्रायव्हर गाडी होणार पार्क, कसं ते जाणून घ्या
Fully automated self-parking system: गेल्या काही वर्षात ऑटो क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. गाड्यांमध्ये नवनव्या सुविधा येत आहेत. विनाचालक गाड्यांची सध्या जगभर चर्चा आहे. असं असताना आता विना ड्रायव्हर गाडी पार्क करता येणार आहे. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. मात्र ही बातमी खरी आहे.
Fully automated self-parking system: गेल्या काही वर्षात ऑटो क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. गाड्यांमध्ये नवनव्या सुविधा येत आहेत. विनाचालक गाड्यांची सध्या जगभर चर्चा आहे. असं असताना आता विना ड्रायव्हर गाडी पार्क करता येणार आहे. कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. मात्र ही बातमी खरी आहे. या फीचर्सला सेल्फ पार्किंग सिस्टम म्हणतात. बॉश आणि मर्सिडीज-बेंझ समूहाला फुल ऑटोमेटेड सेल्फ-पार्किंग प्रणालीसाठी मंजुरी मिळाली आहे. ही जगातील पहिली पूर्णपणे स्वयंचलित ड्रायव्हरलेस SAE लेव्हल 4 पार्किंग सुविधा आहे. या तंत्रज्ञानाद्वारे ड्रायव्हरच्या मदतीशिवाय कार पार्क करता येणार आहे. ही पार्किंग सेवा स्मार्टफोन अॅपद्वारे ऑपरेट केली जाईल आणि त्यासाठी ड्रायव्हरची आवश्यकता नाही. ही सेवा जर्मनीमधील मर्सिडीज-बेंझ म्यूझियमच्या पार्किंग गॅरेजमध्ये वापरली जाणार आहे.
कंपनीने दावा केला आहे की, ड्रायव्हरलेस सिस्टम इंटेलिजेंट पार्किंगच्या माध्यमातून कमी वेळात गाडी त्या जागेत पार्क होईल. त्यामुळे वेळची बचत आणि पार्क करतानाची धास्ती निघून जाईल. दुसरीकडे बॉशचे म्हणणे आहे की, दोन्ही कंपन्यांनी 2015 मध्ये या सुविधेवर काम करण्यास सुरुवात केली. 2018 पासून ही सेवा सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने वापरली जात आहे. ही सेवा वापरण्यासाठी, कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, स्टीयरिंग असिस्टंट, स्टार्ट/स्टॉप फंक्शन यासारखी फीचर्स असणं आवश्यक आहे. मात्र आता सुरक्षा कर्मचाऱ्यांची मदत न घेता ही पार्किंग केली जाणार आहे.
बातमी वाचा- AMT ते DCT पर्यंत चार पद्धतीचे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, जाणून घ्या कोणता पर्याय बेस्ट
हे फीचर कसं काम करेल
या फीचर्सचा वापर करण्यासाठी ड्रायव्हरला फक्त ठरवलेल्या ठिकाणी वाहन घेऊन जावं लागेल. त्यानंतर वाहनातून बाहेर पडावे लागेल. पार्किंग गॅरेजमधील पायाभूत सुविधा वाहनाचा ताबा घेईल आणि तंत्रज्ञानाचा मदतीने कार रिकाम्या जागेवर पार्क करेल. विशेष म्हणजे वाहन पार्किंगसाठी जागा त्याच्या आकारानुसार निवडली जाते.