Lightyear 0 solar car Price and Features: पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ऑटो कंपन्या आणि ग्राहकांनी इलेक्ट्रिक कारकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या काही महिन्यात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपन्या एकापेक्षा एक सरस अशा इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. असं असताना सोलार इलेक्ट्रिक कारची जोरदार चर्चा रंगली होती. काही कंपन्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांवरही काम करत आहेत. मात्र, सौर वाहने अद्याप विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. आता नेदरलँड्सस्थित कंपनीने जगातील पहिल्या सोलर कारचे अनावरण केले आहे. या कारचे नाव LightYear 0 ठेवले आहे. ही कार एका चार्जवर सुमारे 700 किमीची रेंज देते. रिपोर्ट्सनुसार, ही कार टेस्ला मॉडेल एस पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे. याचा सर्वोच्च वेग 160 किमी प्रतितास आहे आणि 10 सेकंदात शून्य ते 100 किमी प्रतितास वेग वाढतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहनात 60 KW चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. हे 174hp पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. एका चार्जवर, याला बॅटरीपासून 625 किमीची रेंज मिळते, तर सौर उर्जेद्वारे 70 किमीची अतिरिक्त श्रेणी उपलब्ध होते. अशा प्रकारे, कारची एकूण श्रेणी 695 किमी आहे. कारमध्ये 5 स्क्वेअर मीटर डबल कर्व्ड सोलर बसवण्यात आले आहे.



LightYear 0 कार यूएईमध्ये सादर करण्यात आलं आहे. कंपनीने आपल्या वेबसाइटवर या वाहनाची किंमत 250,000 युरो (सुमारे 2 कोटी रुपये) ठेवली आहे. UAE मधील इच्छुक खरेदीदार कंपनीच्या वेबसाइटवरून वाहन ऑर्डर करू शकतात. हे वाहन 2023 च्या सुरुवातीपासून ग्राहकांना उपलब्ध होईल.