VIDEO: १३०० रोबोट्सने एकत्र डान्स करत बनवला वर्ल्ड रेकॉर्ड
रोबोटिक तंत्रज्ञावर चालणारी कार तसेच कार्यालयात आणि शेतात काम करण्यासाठी रोबोटचा वापर करण्यात येईल असं चित्र भविष्यात नक्कीच पहायला मिळेल. पण त्यापूर्वी रोबोट्सने एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
नवी दिल्ली : रोबोटिक तंत्रज्ञावर चालणारी कार तसेच कार्यालयात आणि शेतात काम करण्यासाठी रोबोटचा वापर करण्यात येईल असं चित्र भविष्यात नक्कीच पहायला मिळेल. पण त्यापूर्वी रोबोट्सने एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)
हा नवा वर्ल्ड रेकॉर्ड इटलीमध्ये बनला आहे. या ठिकाणी १३०० हून अधिक रोबोट्सने एकत्रित डान्स केल्याचं पहायला मिळालं. रोबोट्सने केलेला हा डान्स परफॉर्मन्स गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं गेलं आहे.
१३७२ रोबोट्सने केला एकत्र डान्स
१३७२ रोबोटने एकत्र मिळून डान्स केला. या डान्स परफॉर्मन्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. इतक्या मोठ्या संख्येने रोबोट्सने पहिल्यांदाच डान्स केला आहे.
टेक्नोलॉजी कंपन्यांनी २०१६ पासून डान्सिंग रोबोट बनवण्यास सुरुवात केली आहे. आता तर चक्क रोबोट्सने डान्स करत एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या रेकॉर्डला 'मोस्ट रोबोट्स डान्सिंग सिमल्टॅनियशली' नाव देण्यात आलं आहे.
रोबोट्सने मोडला रोबोट्सचा रेकॉर्ड
गेल्यावर्षी चीनमध्ये अशाच प्रकारची एक स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत १०६९ रोबोट्सने एकत्र मिळून डान्स केला आणि रेकॉर्ड बनवला. मात्र, या वर्षी या रोबोट्सची संख्या वाढून १३७२ झाली आहे.
या रेकॉर्डमध्ये अल्फा १ एस रोबोटचा वापर केला आहे. हा रोबोट ४० सेमी लांब आणि एक प्लास्टिक कोटिंगसोबत अॅल्युमिनियम मिश्रित धातू पासून बनला आहे.