आयर्लंड : आपल्याला कंपनीचे किंवा स्पॅन कॉल सतत येत असतात तरी वैताग येतो. मात्र एका महिलेच्या चुकीमुळे तिला चार पाच किंवा 50 नाही तर तब्बल 4500 हून अधिक कॉल आले. या सतत खणखणाऱ्या फोनमुळे महिलेला डोकं धरण्याची वेळ आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर आयर्लंडमधील एका विचित्र घटना समोर आली आहे. एका महिलेचा फोन नंबर देताना छोटी चूक केल्यानं 4500 हून अधिक कॉल्स या महिलेला आले.  हेलन मॅकमोहनजवळ प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर आहे. त्यांचा ई मेल पाठवल्यानंतर लोकांना आपल्या उर्वरित प्रीपेड कार्डेची अंतिम मुदती संपण्यापूर्वी खर्च करण्याची आठवण करून देण्यात येणार होती.


स्पेंड लोकल स्कीने एक नंबर नेमका देताना चुकवला. त्यामुळे चुकीचा नंबर लागला. सगळे फोन कॉल एका व्यवसायिक महिलेला गेले.  जाहिरातीमध्ये दिलेला एक नंबर चुकीचा असल्याने महिलेच्या डोक्याला चांगलाच ताप झाला.


एक दोन नाही तर तब्बल 4 हजार 500 हून अधिक फोन आल्याचं तिने सांगितलं. बीबीसीच्या गुड मॉर्निंग अल्स्टरशी बोलताना ती म्हणाली, 'स्पेंड लोकल स्कीमच्या चुकीमुळे मला खूप फोन येत होते. त्यांनी एक नंबर चुकवला ज्यामुळे मला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. 


हा सगळा घोळ कंपनीच्या लक्षात आल्यानंतर कंपनीकडून महिलेची माफी मागण्यात आली. या महिलेनं फोन आलेल्या सर्वांना सकारात्मकपणे मदत करण्याचा निर्णय घेतला मात्र फोन एक किंवा दोन नव्हते किंवा 100 ही नव्हते काही हजारात होते. 


कोणाचाही नंबर डायल करताना किंवा देताना एकदा नाही तर चार वेळा नीट वाचा यामुळे तुम्हाला आणि समोरच्यालाही काहीवेळा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.