Xiaomi 14 Pro Viral Video: Xiaomi 14 Pro सीरीज नुकतीच लाँच झाली आहे. Xiaomi 14 Pro सीरीजच्या फोनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. मजबुतीच्या बाबतीत या फोनने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. कारण या फोनचा हतोडी प्रमाणे वापर करत लाकडात खिळा ठोकण्यात आला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Xiaomi 14 आणि Xiaomi 14 Pro हे दोन फोन चीनमध्ये लाँच झाले आहेत. लवकरच हा फोन भारतासह जगातील अनेक देशांमध्ये लाँच होणार आहे. त्याआधीच या फोनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहाता हा फोन मजबुतीच्या बाबतीत अत्यंत दमदार असल्याचा दावा केला जात आहे. 


काय आहे नेमकं व्हायरल व्हिडिओमध्ये?


या व्हायरल व्हिडिओमध्ये Xiaomi फोनचा हतोड्यासारखा वापर करण्यात आल्याचे दिसत आहे. या फोनच्या सहाय्याने मजबूत अशा लाकडाच्या तुड्यामध्ये खिळा ठोकण्यात येत आहे. हा फोन जोर जोरात खिल्यावर ठोकण्यात येत आहे. फोनच्या ठोकण्यामुळे खिळा लाकडात आता घुसल्याचे दिसत आहे.


एकदम मजबूत स्क्रिन


फोनची स्क्रिन ज्या बाजूला आहे त्याच बाजूने खिळा लाकडात ठोकला जात आहे. यावरुनच या फोनची स्क्रिन किती मजबूत आहे याचा अंदाज येत आहे. फोनची स्क्रिन हा अत्यंत नाजूक भाग असतो. फोन पडला तरी स्क्रिन तुटण्याची फुटण्याची भिती असते. मात्र, या फोनची स्क्रिन खूपच मजबूत आहे. कारण स्क्रिनच्या बाजूनेच खिळा ठोकण्यात येत आहे. यापूर्वी, Xiaomi फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचा वापर करण्यात येत असे. मात्र, आता Xiaomi कंपनीने इन-हाउस ग्लास विकसित केला आहे. यात स्क्रिन प्रोटेक्शनची पूर्ण गॅरंटी देण्यात आली आहे. Xiaomi कंपनीने या ग्लासला ड्रॅगन क्रिस्टल असे नाव दिले आहे. 



Xiaomi 14 Pro सिरीजचे बेस्ट फिचर्स


  • Xiaomi 14 Pro सिरीज मध्ये प्रथमच Xiaomi Hyper OS देण्यात आले आहे. 

  •  Hyper OS  हे MIUI OS ला रिप्लेस करणार आहे. 

  • Xiaomi 14 Pro सिरीज मध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर  देण्यात आला आहे. 

  • Xiaomi 14 Pro सिरीज मध्ये   LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट मिळतो. 

  • या फोनमध्ये  50MP टेलिफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स कॅमेरा आहे.

  • 32MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. 

  •  12GB RAM + 256GB  आणि 16GB RAM + 512GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये हा फोन मिळतो. 

  • 4880mAh क्षमतेचा दमदार बॅटरी बॅकअप आहे. 50W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील आहे.