नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, शाओमी कंपनीने एक जबरदस्त ऑफर लॉन्च केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाओमी कंपनीचं 'DIWALI WITH Mi' सेल सुरु केला आहे. हा सेल २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर दरम्यान सुरु राहणार आहे. दररोज सकाळी १० वाजल्यापासून हा सेल सुरु होणार आहे. या सेलची खास बाब म्हणजे या ठिकाणी केवळ १ रुपयांचा फ्लॅश सेलही उपलब्ध असणार आहे.


शाओमीच्या या सेलमध्ये प्रत्येक दिवशी सकाळी १० वाजता १०० रुपये आणि ५०० रुपयांचे कूपन कंपनी देणार आहे. यासोबतच १ रुपयांचा फ्लॅश सेल दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान सुरु राहणार आहे. तसेच अॅप स्पेशल बिड-टू-विन स्पर्धा दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तर, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट कॉन्टेस्ट तीनही दिवस दुपारी ४ वाजता सुरु होईल.


फ्लॅश सेलमध्ये सहभागी होण्यासाठी ग्राहकांना शाओमी इंडियाच्या mi.com/in अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करावं गालणार आहे. कंपनीने १ रुपयांच्या सेलसाठी काही अटी ठेवल्या आहेत. या अटी आणि नियमांनुसार तुम्ही सेलचा लाभ घेऊ शकता. 


स्मार्टफोनवर शाओमीची खास सूट


शाओमीच्या या दिवाळी सेलमध्ये शाओमी Mi A1 स्मार्टफोन १४,९९९ रुपयांत मिळणार आहे. सूट मिळविण्यासाठी मेंबर एफ-कोडच्या एक्सचेंजमध्ये Mi टोकनचा वापर केला जाऊ शकतो. रेडमी नोट 4 (4 जीबी+64 जीबी) मीडॉटकॉम वर १२,९९९ रुपयांच्या ऐवजी १०,९९९ रुपयांत उपलब्ध होणार आहे. तसेच Mi Max 2 ची किंमतही २००० रुपयांनी कमी झाली आहे.