मुंबई : चायनीज स्मार्टफोन कंपनी शाओमी (Xiaomi)ने भारतीय बाजारात मोठा रेकॉर्ड बनवला आहे. भारतीय बाजारात चार महिन्यात 'रेडमी नोट 5' सिरीजचे ५० लाख मोबाईल विकले गेल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 'रेडमी नोट 5' (Redmi Note 5) आणि 'रेडमी नोट 5 प्रो' (Redmi Note 5 Pro)हे दोन मोबाईल भारतीय ग्राहकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. 


फेब्रुवारीत झाले लॉन्चिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रेडमी नोट 5' आणि 'रेडमी नोट 5 प्रो' व्हर्जन असलेला 'रेडमी नोट 5' सिरीज कंपनीने याच वर्षी फेब्रुवारीत लॉन्च केली होती. 3 जीबी रॅम आणि  32 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या 'रेडमी नोट 5' ची किंमत 9,999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या मोबाईलची किंमत 11,999 रुपये आहे. स्मार्टफोनमध्ये '18:9 फुल एचडी प्लस' डिस्प्ले, 4,000 mAh बॅटरी आणि क्वालकम स्नॅपड्रेगन 625 प्रोसेसरसोबत 12 MP रिअर कॅमेरा आणि कमी प्रकाशातही एलईडी सेल्फी लाईटची सुविधा देण्यात आली आहे. 


'रेडमी नोट 5 प्रो' च्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या मोबाईलची किंमत 13,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल असलेल्या मोबाईलची किंमत 16,999 रुपये आहे. यात '18:9 फुल एचडी प्लस' डिस्प्ले त्याचबरोबर ड्युल रियर कॅमेरा सिस्टम (12 MP आणि 5 MP) , 20 MP चा सेल्फी कॅमेरा, 'फेस अनलॉक' ऑप्शन आणि स्नॅपड्रेगन 636 प्रोसेसर देण्यात आला आहे.