नवी दिल्ली : चायनीज मोबाइल कंपनी शाओमीने स्मार्टफोन मार्केटमध्ये आपली पकड मजबूत केल्यानंतर स्मार्ट टीव्ही लॉन्च केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधीही कंपनीने ५५ इंचाची टीव्ही ४ लॉंच केलीए. यावेळी कंपनीने ४३ इंच आणि ३२ इंच वाल्या एमआय टीव्ही 4 ए लॉन्च केलाय.


भारतीय ग्राहकांच्या पसंतीनुसार हे दोन्ही मॉडेल इथल्या बाजारपेठेत आणले आहेत.


कंपनीकडुन लॉंच केलेल्या ऑफरनुसार ३२ इंचच्या मॉडेलची किंमत १३,९९९ रुपये आणि ४३ इंचच्या मॉडेलची किंमत २२,९९९ रुपये आहे. 


MI.com वर ४३ इंचच्या टीव्हीची किंमत २४,९९९ रुपये आणि ३२ इंचच्या टीव्हीची किंमत १४,९९९ रुपये दाखवेल. लॉन्च ऑफरनुसार जियोफाय ४ जी हॉटस्पॉट डिव्हाइससोबत २,२०० रुपये कॅशबॅक मिळेल. दोन्ही टीव्हीत ५ लाख तासांचा कंटेंट दिला गेलायं. यामध्ये ८० टक्के फ्री कंटेंट आहे. 


वैशिष्ट्य :


 एम आय टीव्ही ४ ए ४३ इंच चे स्पेसिफिकेशन 
 शाओमीच्या ४३ इंचच्या एम आय टीव्ही ४ ए मध्ये १९२० x 1080 पिक्सल रिजॉल्यूशचा फुल एचडी डिस्प्ले 
 व्ह्यू एंगल १७८ डिग्री 
 एमलॉजिक टी ९६२ प्रोसेसर 
 ४५० एमपी ५ जीपीयू 
 ८ जीबी स्टोरेजच्या स्मार्ट टीव्हीत १ जीबी रॅम