नवी दिल्ली : चायनीज मोबाईल निर्माता कंपनी शाओमी (Xiaomi)ने स्मार्ट टीव्हीची नवी रेंज लॉन्च केली आहे. कंपनीने लॉन्च केलेल्या नव्या स्मार्ट टीव्हीमध्ये Mi TV 4C, Mi TV 4X आणि Mi TV 4S यांचा समावेश आहे. या स्मार्ट टीव्हींच्या डिस्प्लेची साईज 32 इंचापासून 55 इंचापर्यंत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या स्मार्ट टीव्हीची किंमत 10,600 रुपयांपासुन 35,100 रुपयांपर्यंत असू शकते. कंपनीने टीव्हीची प्री-बुकिंग सुरु केली असुन त्याची डिलिव्हरी 31 मार्चपर्यंत सुरु होणार आहे. याच दिवशी शाओमीचा अॅन्युअल प्रोडक्टही लॉन्च होणार आहे. यामध्ये शाओमी Mi 8 आणि MIUI 10 लॉन्च होण्याची शक्यता आहे.


कंपनीने हे चारही स्मार्ट टीव्ही सध्या चीनी बाजारपेठेत लॉन्च केले आहेत. मात्र, हे भारतीय बाजारपेठेत कधी लॉन्च होणार याची माहिती समोर आलेली नाहीये.


Mi TV 4C


32 इंचाचा Mi TV 4C या टीव्हीची किंमत शाओमीने चीनमध्ये 999 युआन (जवळपास 10,600 रुपये) ठेवली आहे. या टीव्हीमध्ये 1366x768  रिझॉल्युशन असलेला एचडी पॅनल देण्यात आला आहे. हा 178 डिग्री व्ह्यूव अँगल देतो. या टीव्हीत एआरएम अॅडव्हान्स मल्टी कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. याचा 1.5 गिगाहर्ट्जचा स्पीड आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये दोन एचडीएमआय पोर्ट, एक एव्ही पोर्ट आणि यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे.


Mi TV 4S


Mi TV 4S हा स्मार्ट टीव्ही कंपनीने 43 इंच आणि 55 इंच या दोन साईजमध्ये लॉन्च केला आहे. 43 इंचाच्या मॉडेलची किंमत चीनमध्ये 1799 युआन (जवळपास 19,100 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा 4K अल्ट्रा एचडी डिस्प्ले देतो. हा टीव्ही 178 डिग्री व्ह्यूव अँगल देतो. क्वॉड-कोअर प्रोसेसर असलेल्या या टीव्हीत 1GB रॅम आणि 8GB ची स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे 55 इंचाच्या व्हेरिएंटमध्ये 1 GB रॅम आणि 8 GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे. कंपनीने याची किंमत 3,299 युआन (जवळपास 35,100 रुपये) ठेवली आहे.


Mi TV 4X


Mi TV 4X हा स्मार्ट टीव्ही 55 इंचाच्या स्क्रिनसोबत येतो. याची किंमत 2,799 युआन (जवळपास 29,800 रुपये) ठेवण्यात आली आहे. 3840x2160 पॅनल असलेल्या या टीव्हीत 4K एचडीआर आहे. एआय बेस्ड रेकग्नेशन सिस्टम असलेल्या या टीव्हीत 64 बिटचा क्वॉड-कोअर प्रोसेसर दिला आहे. या टीव्हीत 2 GB रॅम आणि 8 GB इंटरनल स्टोरेज आहे. कनेक्टिविटीसाठी यामध्ये एचडीएमआय पोर्ट, यूएसबी पोर्ट आणि एव्ही इनपूट दिलं आहे.