नवी दिल्ली : वेगवेगळ्या मोबाईल कंपन्या आता सेल्फी चाहत्यांना नजरेसमोर ठेवून स्मार्टफोन बाजारात आणत आहेत. आता शाओमीने गुरूवारी भारतात एक नवीन सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन सीरिजमध्ये रेडमी Y1 आणि रेडमी Y1 Lite आणले आहेत. सोबतच MIUI9 यूजर इंटरफेस वरूनही पडदा उठवला आहे.   


रेडमी Y1


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेडमी Y1 स्मार्टफोन ड्यूअल सिम स्मार्टफोन आहे जो अ‍ॅन्ड्रॉईड नूगावर बेस्ड MIUI9 वर रन होतो. या स्मार्टफोनमध्ये खास सेल्फी लाइट देण्यात आलाय. ज्यासोबत १६ मेगापिक्सल कॅमेरा आहे. रेडमी Y1 मध्ये ५.५ इंचाचा कॉनिंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन एचडी डिस्प्ले दिला आहे. तर १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आलाय. सोबतच 3080mAh बॅटरी देण्यात आलीये. रेडमी Y1 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४३५ प्रोसेसर दिला गेलाय. याचे दोन रॅम व्हेरिएंट उतरवण्यात आले आहेत. एकात ३जीबी रॅम आणि ३२जीबी रॅम स्टोरेज आहे. दुस-यात ४जीबी रॅम आणि ६४जीबी स्टोरेज दिलं गेलंय. 


या फोनला फिंगरप्रिंट सेंसरही देण्यात आलंय. या फोनच्या ३जीबी रॅम असलेल्या व्हेरिएंटची किंमत ८ हजार ९९९ रूपये आणि ४जीबी व्हेरिएंटची किंमत १० हजार ९९९ रूपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही स्मार्टफोन ८ नोव्हेंबरपासून डार्क ग्रे आणि गोल्ड रंगांमध्ये अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असतील. 


रेडमी Y1 लाइट


शाओमी Redmi Y1 Lite चा डिस्प्ले सुद्धा ५.५ इंचाचा आहे आणि Redmi Y1 सारखाच आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसरवर रन होतो. हा फोन २जीबी रॅम आणि १६जीबी स्टोरेजसोबत मिळणार आहे. हे स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतं. या फोनमध्ये १३ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलाय.