शाओमीचा MI MIX 2 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत
चीनची मोबाईल कंपनी शाओमीने मंगळवारी नवा Xiaomi Mi MIX 2 हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. शाओमीच्या Mi हा दुसरा स्मार्टफोन आहे. चीनमध्ये आधीच हा स्मार्टफोन लॉन्च झालाय. कंपनीने हा स्मार्टफोन अनेक वैशिष्ट्यांसोबत लॉन्च केलाय.
नवी दिल्ली : चीनची मोबाईल कंपनी शाओमीने मंगळवारी नवा Xiaomi Mi MIX 2 हा स्मार्टफोन लॉन्च केलाय. शाओमीच्या Mi हा दुसरा स्मार्टफोन आहे. चीनमध्ये आधीच हा स्मार्टफोन लॉन्च झालाय. कंपनीने हा स्मार्टफोन अनेक वैशिष्ट्यांसोबत लॉन्च केलाय.
काही दिवसांपूर्वी कंपनीने Mi A1 हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. Mi MIX 2 मध्ये 1080x 2160 पिक्सलचा ५.९९ इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. आयपीएस एलसीडी कॅपेसिटीव्ह टच स्क्रीन असलेल्या या डिस्प्लेमध्ये कोरनिंग गोरिल्ला ग्लासचा प्रयोग करण्यात आलाय.
शाओमीचा नवा फोन अॅन्ड्रॉईड ७.१ नोगटवर काम करतो. यात व्कॉलकॉम MSM8998 स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर देण्यात आलाय. फोनमध्ये कंपनीकडून कोणताही कॉर्ड स्लॉट दिला नाहीये. याचे ६जीबी आणि ८ जीबीचे दोन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. हा फोन ६४ जीबी, १२८ जीबी आणि २५६ जीबी इंटरनल मेमरीसोबत मिळेल. पण भारतीय बाजारात या फोनचं केवळ १२८ जीबी व्हेरिएंटच मिळणार आहे.
कॅमेराच्या क्वालिटीबाबत शाओमीचे फोन अधिक चांगले मानले जातात. Mi MIX 2 मध्ये १२ मेगापिक्सल बॅक कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रन्ट कॅमेरा देण्यात आल्याची शक्यता आहे. कंपनीचा दावा आहे की, फ्रन्ट कॅमेरा यूजरचा चेहरा ओळखण्याची क्षमता ठेवतो. या फिचरमुळे तुम्ही डिव्हाईस लॉक ओपन करू शकता. त्यासोबत फोनमध्ये फिंगर प्रिन्ट सेन्सरही देण्यात आलाय.
शाओमीच्या या फोनमध्ये 3500mAh ची बॅटरी देण्यात आलीये. या फोनमध्ये USB Type-C चार्जिंग पॉईंटही देण्यात आलाय. कंपनीने भारतीय बाजारात या फोनचं सिरॅमिक बॉडी असलेलं व्हेरिएंट उतवरलं आहे. या स्मार्टफोनची किंमत ३५ हजार ९९९ रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.