नवी दिल्ली : शाओमीने  (Xiaomi) भारतात नवा स्मार्टफोन रेडमी ८  (Redmi 8) लॉन्च केला आहे. हा नवा स्मार्टफोन Redmi 7 चा अपग्रेड आहे. या नव्या स्मार्टफोनची बॅटरी आणि कॅमेरा याची खास वैशिष्ट्ये आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Xiaomi Redmi 8 स्मार्टफोन कंपनीने भारतात ७ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लॉन्च केला आहे. हा फोन दोन वेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. 


३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल स्टोरेज असणाऱ्या Redmi 8 ची किंमत ७ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर ४ जीबी रॅम ६४ जीबी स्टोरेज Redmi 8 ची किंमत ८ हजार ९९९ रुपये देण्यात आली आहे.


Redmi 8 फ्लिपकार्ट आणि mi.com वर १२ ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. 


रेडमी ८, रुबी रेड, सफायर ब्लू आणि ओनेक्स ब्लॅक रंगात असणार आहे.



काय आहेत रेडमी ८ ची वैशिष्ट्ये - 


- ६.२२ इंची एचडी डिस्प्ले
- क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर (Qualcomm Snapdragon processor)
- १२ + २ मेगापिक्सल रियर कॅमेरा सेटअप
- ८ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
- फ्रिंगरप्रिंट सेन्सेर
- ५००० mAh बॅटरी
- १८ W फास्ट चार्जिंग, USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.


Redmi 8 नंतर कंपनी भारतात मिड रेंज गेमिंग सेंट्रिक स्मार्टफोन Redmi Note 8 Pro लॉन्च करणार आहे.