नवी दिल्ली : सेल्फीच्या वेडापायी अनेकजण सतत फोन बदलत असतत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा शिओमीचे फोन सर्वात झटपट विकले गेले. सेल्फीचे ग्राहकांमधील खूळ लक्षात घेता त्यांनी आता केवळ सेल्फीसाठी खास स्मार्टफोन बाजारात आणणार असल्याची माहिती दिली आहे. येत्या २ नोव्हेंबरला भारतात हा फोन येणार आहे.


दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये शिओमीने याबाबत घोषणा केली. तसेच शिओमी इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर मनू कुमार जैन यांनी ट्विटरच्या माध्यमातून याची माहितीदेखील दिली आहे. 
फोन बाबत माहिती देताना त्याचे नाव सांगितले नसले तरीही हा फोन ' मी नोट ३' असेल असा काही मिडीया रिपोर्टचा अंदाज आहे. 



 


शिओमीच्या  मी मिक्स २ ची स्पर्धा अ‍ॅपल, सॅमसंगसारख्या फोनशी सुरू आहे. 


कसा आहे Mi Mix 2 फोन ? 
6GB RAM सोबत 128GB बोर्ड मेमरी 
 3,400mAh बॅटरी 
 Mi Mix 2  मध्ये ड्युएल सीम आहे.
Type-C चार्जिंग आणि डाटा शेअरिंग युएसबी
12MP रिअर कॅमेरा , सोबत ड्युएल फ्लॅश आणि four-axis Optical Image Stabilisation ची सोय आहे. 
शुटिंग करताना जर्क टाळण्यासाठी  Sony IMX386 sensor
या फोनला गोरिला ग्लास आहे.