मुंबई : चीनी कंपनी असलेल्या शाओमी जगातला पहिला 5 जी इंटरनेट स्पीड आणि 10 जीबी रॅम मेमरी असलेला फोन बाजारात आणतेय. कंपनीतर्फे याची अधिकृत घोषणा करण्यात आलीयं. चीनची राजधानी बीजिंगमध्ये येत्या 25  ऑक्टोबर ला शाओमीचं नवं फ्लॅगशिप फोन  Mi Mix3 स्टेट ऑफ आर्ट आणि मॉर्डन टेक्नोलॉजीचा हा फोन हायस्पीड इंटरनेट वापरासाठी आणि अॅडव्हान्स फोन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाओमीचा हा फोन जगभरातील बाजारात हंगामा करेल असं जाणकार म्हणत आहेत. यामागचं कारणही तसंच आहे. आतापर्यंत 10 जीबी मेमरी आणि 5 जी स्पीड असलेला कोणताही फोन बाजारात उपलब्ध नव्हता.


कोणाशी तुलना ?


तसं पाहायला गेलं तर ओप्पोने लॉंच केलेल्या फ्लॅगशिप फोनमध्ये 10 जीबी रॅम होता 5 जी स्पीडची सुविधा यामध्ये नव्हती.


जगभरातल्या अनेक मोबाईल कंपन्या 5 जी फोन आणण्याच्या प्रयत्नात आहेत. शाओमीने यामध्ये सर्वात आधी उडी घेतलीयं. 


फिचर्स


या फोनच्या फिचर्सबद्दलही अनेक चर्चा रंगल्या आहेत.  फोन 6.4 इंच इतका असून AMOLED bezel-less display आणि Qualcomm प्रोसेसरचा आहे.


यामध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधादेखील देण्यात आलीयं.