Yamaha Fazer 250 नव्या रुपात होणार लाँच
यामाहा आपली टॉपक्लास बाइकमधील एक Yamaha Fazer 250 ला पुन्हा एकदा लाँच करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा बाजारात आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांकडून Fazer 250 च्या नव्या मॉडेलची चर्चा होत होती.
मुंबई : यामाहा आपली टॉपक्लास बाइकमधील एक Yamaha Fazer 250 ला पुन्हा एकदा लाँच करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा बाजारात आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेकांकडून Fazer 250 च्या नव्या मॉडेलची चर्चा होत होती.
आणि तेवढ्यातच या बाइकच्या प्रोडक्शन रेडी वेरिएंटचे फोटो व्हायरल झाले. तसेच एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. नवीन बाइक ही जुन्या वेरिएंटच्या तुलनेत प्रचंड वेगळी आहे. व्हिडिओत दाखवण्यात आलेली बाइक ही बॅलिस्टिक ब्लू कलरच्या वेरिएंटची आहे.
फीचर्स - या बाइकच्या लूक्समध्ये भरपूर बदल करण्यात आले आहेत. याच्या फ्रंटला स्पोर्टस बाइक सारखा लूक देण्यात आला आहे. जो R 15 शी मिळता जुळता आहे. या सोबतच Yamaha Fazer 250 चे टेललॅम्प्स, हँडलबार, गियरस्विच काही प्रमाणात FZ25 शी मिळते जुळते आहेत. फ्युअल टँकच्या डिझाइन भरपूर बदल करण्यात आला आहे. यासोबतच डिजिटल स्पिडिमीटरला आणखी स्टाइलिश केलं आहे. २ रायडर्सला सीट एकत्र न देता ती वेगवेगळी देण्यात आली आहे. सोबतच एलॉय व्हील्स आणि अॅल्युमिनीयम फिनिश्ड एग्जॉस्ट शिल्ड देखील आहे. फ्युअल टँक कॅपिसिटी ही १४ लीटरची देण्यात आलेली आहे.
इंजिन - रिपोर्टनुसार या बाइकमध्ये २४९ सीसी फ्लू इंजिक्टेड, सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड ४ स्ट्रोक इंजिन देण्यात आलं आहे. इंजिन २०.६ एचपीवर ८ हजार आरपीएम आणि २० एनएमचा टॉर्क देण्यात आला आहे. ५ स्पीड ट्रांस्मिशन गिअर बॉक्ससोबत हे इंजिन जोडलं गेलं आहे. यासोबतच फ्रंट आणि रियर टायर्सवर सिंगल हायड्रॉलिक ब्रेक्स असणार आहेत.
रिपोर्टनुसार, ही बाइक दिवाळी किंवा दसऱ्याच्या आसपास लाँच होणार आहे. याची खरी किंमत अद्याप कळलेली नाही. मात्र ही बाइक १ लाख ३५ हजार रुपयांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.