नवी दिल्ली: बाईकच्या चाहत्यांसाठी यामाहा कंपनीने नवीन जनरेशनच्या २ बाईक्स लॉन्च केल्या आहेत. यामाहा कंपनीने यामाहा एफझेड एफआय (YAMAHA FZ FI) आणि यामाहा एफझेड-एस एफआय (YAMAHA FZ-S FI) या दोन बाईक बाईक्स लॉन्च केल्या आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यामाहा एफझेड एफआय बाईकची किंमत ९५ हजार रुपये आहे. तर यामाहा एफझेड-एस एफआय बाईकची किंमत ९७ हजार रुपये देण्यात आली आहे. यामाहा एफझेड-एस एफआय मध्ये बदल करुन सादर करण्यात आली आहे. सरकारच्या नियमानुसार, बाईक्समध्ये एंटिलॉक ब्रेकिंग सिस्टिम देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


यामाहा बाईकचे वैशिष्ट्ये



यामाहा बाईक एफझेड एफआयच्या इंजिनमध्ये १४९ सीसीचा सिंगल सिलिंडर देण्यात आला आहे. बाईकमधील इंजिन १३.२ बीपीएच ( ब्रेक हॉर्स पॉवर) आणि पीक टार्क जनरेट करणारे आहे. तसेच बाईकमध्ये ५-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. बाईकच्या दोन्ही चाकाला डिस्क ब्रेक लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर ड्युअल पॉड हॅडलॅम्प , सिंगल पीस सीट, अलॉय व्हिल्स आणि नवीन फ्युलची टाकी देण्यात आली आहे. 


नवीन जनरेशनची यामाहाच्या बाईक आधीच्या मॉडेलपेक्षा जास्त आकर्षक ठरणार आहे. तसेच, कंपनीने या बाईकची बुकिंग सुरु केली आहे. भारतात या बाईकची तुलना बाजारात असलेल्या होन्डा सीबी हॉर्नेट १६० आर, टीव्हीएस अपाचे आरटीआर १६० 4 व्ही, बजाज पल्सर एनएस १६० आणि हिरो एक्स्ट्रीम २०० आर या बाईकशी होणार आहे. बाईकच्या किंमतीत १० हजार रुपयाने वाढ करण्यात आली आहे.