`यमाहा`च्या या बाईकची किंमत अडीच लाखांनी घसरली!
`यमाहा आर १` या बाईकच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात घट झालीय.
मुंबई : 'यमाहा आर १' या बाईकच्या किंमतीत प्रचंड प्रमाणात घट झालीय.
डिसेंबर २०१७ मध्ये 'यमाहा आर १' लॉन्च करण्यात आली होती. त्यावेळी तिची शोरुम किंमत २०.७३ लाख निर्धारित करण्यात आली होती. आता तब्बल २.५७ लाखांनी या बाईकच्या किंमतीत घट झालीय.
त्यामुळे, आता जर तुम्हाला 'यमाहा आर १' ही बाईक घ्यायची असेल तर केवळ १८.१६ लाखांत उपलब्ध होईल. सीबयू इंपोर्टसमध्ये नुकतीच एक्साईज ड्युटी कमी करण्यात आलीय त्यामुळे ही घट करणं शक्य झालंय.
'यमाहा आर १' ही बाईक टेक ब्लॅक आणि ब्लू अशा दोन रंगांत उपलब्ध आहे.
९९० सीसीचं क्रॉस प्लेन, ४ सिलिंडर, ४ वॉल्व इंजन यात उपलब्ध आहे. तसंच इंजन १९७.२ बीएचपी का पॉवर आणि ११२ न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतं. ६ स्पीड गियरबॉक्ससहीत इंजिन, क्विक शिफ्ट सिस्टम, लिफ्ट कंट्रोल सिस्टम, एलईडी हेडलॅम्प अशा सुविधाही देण्यात आल्यात.