नवी दिल्ली : यामाहाने टोकियोमध्ये आयोजित ४५व्या मोटर शोमध्ये आपली तीन चाकी सुपरबाईक लॉन्च केली आहे. या बाईकचं नाव 'यामाहा निकेन' असं असून ही बाईक एमटी-०९ वर आधारित आहे.ॉ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामाहाने आपल्या निकेन या बाईकची संपूर्ण माहिती या मोटर शोमध्ये दिली नाही. पण, अपेक्षा आहे की ६ नोव्हेंबर रोजी इटलीतील मिलान येथे होणाऱ्या ईआयसीएमए शोमध्ये कंपनी या बाईकसंदर्भात अधिक माहिती देईल.


गेल्या टोकियो मोटर शोमध्ये यामाहाने MWT-9 कॉन्सेप्टचं सादरीकरण केलं होतं. त्याचं फ्रंट-एंड या बाईकसोबत खूपच मिळतो. मात्र, बाईकच्या इतर पार्ट्समध्ये बदल करण्यात आला आहे.


निकेनच्या बाबतीत त्याचा आकर्षक लूक आणि फ्रंट एंड याचीच सर्वाधिक चर्चा होत आहे. यासोबतच आणखीन एका फिचरची चर्चा होत आहे आणि तो म्हणजे बाईकचं पेट्रोल इंजिन, ३ चाकं, ३ सिलिंडर यांची.


तीन चाकांची ही स्पोर्ट्स बाईक LMW टेक्नोलॉजीवर काम करते. LMW म्हणजे लिनिंग मल्टी व्हिल टेक्नोलॉजीमुळे बाईकला चांगली ग्रिप मिळते. हाय स्पीडमध्येही बाईक टर्न केल्यास बॅलेंस बिघडत नाही.


निकेन या बाईकच्या पूढच्या भागात दोन व्हील आणि एक रियर व्हील आहे. पूढील दोन चाकं १५ इंचाचे आहेत. तीन चाक असलेल्या बाईकचं कॉन्सेप्ट पहिल्यांदाच समोर येत आहे.


यामाहा८निकेनमध्ये लिक्विड-कूल्ड, फ्यूल-इंजेक्टेड, फोर-स्ट्रोक, डीओएचसी, फोर-वॉल्व, इन-लाईन ट्रिपल इंजिन देण्यात आलं आहे. तीन सिलिंडर असलेल्या या इंजिनची पॉवर ८४७ सीसी आहे.