यामाहाने आणली ३ चाकी स्कूटर
यामाहाची नवीन ३ चाकी स्कूटर बाजारात
मुंबई : टू व्हीलर कंपनी यामाहाने नवीन ३ चाकी स्कूटर बाजारात आणली आहे. Tricity300 असं या स्कूटरचं नाव आहे. या बाईकला पुढच्या बाजुला २ चाकं आहेत. कंपनीने शहरातील वाढती वाहतूक कोंडीनुसार ही स्कूटर डिझाईन केली आहे. कंपनीने टोकयो मोटर शो २०१९ मध्ये ही स्कूटर लॉन्च केली. यामाहाकडून मात्र या स्कूटरची किंमत किती असेल याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
स्कूटरची वैशिष्टे
या स्कूटरमध्ये २९२ सीसीचं इंजिन आहे.
लिक्विड कूल्ड, ४-स्ट्रोक, ४-वॉल्व, सिंगल सिलेंडर, एसओएचसी टाईप इंजिन
स्कूटरचं वजन २३९ किलो आहे.
स्कूटरच्या फ्यूल टँकची क्षमता १३ लीटर आहे.
ही स्कूटर तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. कंपनीने म्हटलं की, ही स्कूटर ट्रायसिटी फॅमिलीचं सर्वात हल्क वाहन आहे. लांब प्रवासासाठी आणि हायवेवर ही गाडी चांगला पर्याय आहे.
यामाहाची ही स्कूटर अजून कोणकोणत्या फिचर्स सोबत बाजारात येणार आहे, याची माहिती लवकरच कंपनीकडून जाहीर होण्याची शक्यता आहे.
Tricity300 स्कूटर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात यूरोपच्या बाजारात लॉन्च होणार आहे. भारतात ही स्कूटर कधी लॉन्च होणार याबाबत अजून कोणतीही माहिती आलेली नाही.