SBI च्या या अॅपला १० महिन्यात १ कोटी लोकांनी डाऊनलोड केलं...
एसबीआय ग्राहकांनी योनो अॅप एवढा आवडला की, एसबीआयच्या १० महिन्यात १ कोटी ग्राहकांनी अॅप डाऊनलोड केला.
मुंबई : एसबीआय ग्राहकांनी योनो अॅप एवढा आवडला की, एसबीआयच्या १० महिन्यात १ कोटी ग्राहकांनी अॅप डाऊनलोड केला. एसबीआयने हा अॅप २४ नोव्हेंबर २०१७ रोजी लॉन्च केला. YONO चा अर्थ आहे You Only Need One. एसबीआयचे ग्राहक आपली बँकिंग, खरेदी, लाईफस्टाईल, आणि गुंतवणूक संबंधी, ग्राहकांच्या गरजेची सुविधा या अॅपवर देतात, आणि ग्राहकही मोठ्या प्रमाणात हा अॅप वापरत आहेत.
योनो अॅपला एबीएफ रिटेल बँकिंग अवॉर्डस २०१८ या वर्षात मोबाईल बँकिंग इनेशेटीव्ही अवॉर्ड देखील मिळाला आहे.
टॉप फायनॅन्शियल अॅपमध्ये समावेश
सर्वोत्तम ५ फायनॅन्शियल अॅपमध्ये एसबीआयच्या योनो अॅपचा समावेश आहे. एसबीआयचा योनो अॅपचं नाव, अॅपस्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरील अॅपमधील, ५ फायनॅन्शियल टॉप अॅप्समध्ये घेतलं जातं.
पाहा योनोवर किती मोठे मर्चेन्टस आले...
योनो अॅप लॉन्च झाल्यानंतर एसबीआयने आयआरसीटीसी, बूकमायशो, एसओटीसी, एक्सपीडिया, किंडल, बुकिंग डॉट कॉम आणि मोर्जार्टो सह २५ नवीन ई-मर्चेंटसला यात समावून घेतलं आहे.
यासोबत टाटामोटर्स, हुंदई, फोर्ड अशा ऑटो कंपन्यांसोबत देखील, योनोवरील एकून मर्चेंटसची संख्या जवळ-जवळ ८५ वर पोहोचली आहे.