मुंबई: तुमच्या कॉम्प्यूटरला हाय सिक्यॉरिटी पासवर्ड टाकू लॉक केला असेल. तसेच, पासवर्ड हाय सिक्यॉरिटीवाला असल्याने तुमचा कॉम्प्यूटर सुरक्षित आहे, असा विश्वास तुम्ही बाळगून असाल तर तो तुमचा गैरसमज आहे. एका संशोधनामुळे मोठा खुलासा पुढे आला आहे की, आपल्या हाताच्या बोटांनी किबोर्डवर निर्माण झालेल्या हीटचा वापर करून हॅकर्स तुमचा पासवर्ड हॅक करू शकतात. यूनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये हे संशोधन करण्यात आले आहे.


या प्रकारच्या हॅकींगला 'थर्मेन्टॉर' असे नाव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या संशोधनावर काम करणारे प्रोफेसर जीन सुडीक यांनी सांगितले की,'पासवर्ड हॅकींगचा हा एक नवाच प्रकार आहे. मिड रेंज थर्मल कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक नॉर्मल कीबोर्डवर क्लिक केलेल्या कीज कॅप्चर करून हॅकर्स तुमचा पासवर्ड हॅक करू शकतात. केवळ पासवर्ड टाईप करून तुम्ही निघून गेलात तर, हॅकर्स तुमची माहिती लिक करू शकतात. या प्रकारच्या हॅकींगला 'थर्मेन्टॉर' असे नाव देण्यात आले आहे. खास करून टेक्स्ट, कोड्स, बँकींग पिन्स मिळवण्यासाठी अशा प्रकारचा वापर केला जाऊ शकतो', अशी भीतीही सुडी यांनी दिली आहे.


थर्मल कॅमेऱ्याच्या सहाय्याने हॅकींग


या प्रकारचे हॅकींग करताना हॅकर व्हिक्टिमचा किबोर्ड विव्ह एकदम स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने थर्मल कॅमेरा सेट करावा लागतो. अशा पद्धतीने घेतलेल्या फुटेजमुळे यूजर्सने किबोर्डवरील कोणकोणत्या बटनांचा वापर केला याची माहिती मिळू शकते. ही माहिती मिळाली तर, तुमचा पासवर्डही तुमच्या परस्पर बदलला जाऊ शकतो.