मुंबई : व्हॉट्सअ‍ॅप व्हॉईस कॉलसाठी एक नवीन इंटरफेस विकसित करत आहे. हा इंटरफेस इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपच्या Android आणि iOS दोन्ही आवृत्त्यांसाठी काम करेल. या नवीन इंटरफेसद्वारे वैयक्तिक आणि गट व्हॉईस कॉलसाठी अधिक चांगला अनुभव आणण्याचे WhatsAppचे लक्ष्य आहे. WABetainfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप आता व्हॉईस कॉल करणार्‍या वापरकर्त्यांसाठी एक नवीन इंटरफेस सादर करण्यावर काम करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता की, WhatsApp भविष्यातील अपडेट्ससाठी इंटरफेसला अधिक कॉम्पॅक्ट आणि प्रगत करण्यासाठी आणि त्याची रचना सुधारण्यासाठी पुन्हा डिझाइन करत आहे.


नवीन रीडिझाइन केलेला फॉर्म विशेषतः ग्रुप व्हॉईस कॉल करताना चांगला दिसेल. कार्यक्षमतेच्या बाबतीत बोलायचे झाले तर, कॉल स्क्रीन अजिबात बदलत नाही, सर्व बटणे आणि इंटरफेस घटक आहे, त्या ठिकाणी आहे, त्याच्यात काहीही बदल होणार नाही.


हा स्क्रीनशॉट iOS साठी WhatsApp वर घेण्यात आला होता, परंतु WhatsApp Android साठी WhatsApp beta च्या भविष्यातील समान रीडिझाइनची योजना करत आहे. ज्यामुळे नवीन इंटरफेस अधिक संक्षिप्त आणि प्रगत दिसत आहे.



व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन इंडिकेटर दिसेल


अहवालानुसार, कंपनी यामध्ये अशी योजना जोडण्याची तयारी करत आहे, जे वापरकर्त्यांना सांगतील की, त्याच्या प्लॅटफॉर्मवरून केलेले सर्व कॉल एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहेत.


"तुमचे वैयक्तिक कॉल एंड-टू-एंड एनक्रिप्टेड आहेत" असा संदेश म्हणून इंडिकेटर दिसेल. त्याच्या प्लॅटफॉर्मवरून केलेल्या व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलसाठी, हा मेसेज अ‍ॅपच्या कॉल्स टॅबमध्ये केलेल्या किंवा प्राप्त केलेल्या कॉलच्या खाली दिसेल.


WhatsApp ने 2016 मध्ये त्यांच्या प्लॅटफॉर्मवर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सादर केले होते. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीने Android वापरकर्त्यांसाठी Google ड्राइव्ह आणि iPhone वापरकर्त्यांसाठी iCloud वर संग्रहित केलेल्या चॅट बॅकअपसाठी सुरक्षा वाढवली आहे.


या वैशिष्ट्याची घोषणा करताना, व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले होते की, "व्हॉट्सअ‍ॅप किंवा तुमचा बॅकअप सेवा प्रदाता तुमचा बॅकअप वाचू शकणार नाही किंवा ते अनलॉक करण्यासाठी आवश्यक 'की' ऍक्सेस करू शकणार नाही."