YouTube : छोटे व्हिडिओ म्हणजे शॉट्स किंवा रिल्स यांचा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणावक वाढताना दिसतोय. युझर्स इतर कोणत्याही सोशल मीडिया वेबसाइट किंवा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपेक्षा शॉट्स व्हिडिओवर अधिक वेळ घालवत असल्याचीही नोंद करण्यात आलीये. यामुळेच यूट्यूबने आपल्या प्लॅटफॉर्मवर शॉर्ट व्हिडीओ अर्थात यूट्यूब शॉर्ट्सचं फीचर आणलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे शॉर्ट व्हिडीओ जगभर खूप लोकप्रिय झाले असून कंपनी यातून कमाई करण्याचा विचार करतेय. केवळ कंपनीच नाही तर युझर्सना YouTube Shorts मधून पैसे कमवण्याची संधीही देतेय.


YouTub वर नवं फीचर


मंगळवारी, कंपनीने YouTube Shorts वर एक नवीन फीचर अॅड केलंय. काही युझर्स अमेरिकेत या फिचरची चाचणी घेत होते. याच्या मदतीने युझर्स व्हिडिओमध्ये प्रोडक्टना टॅग देखील करू शकणार आहेत.


गुगलच्या प्रवक्ते यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, 'यूएस, भारत, ब्राझील, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामधील दर्शकांना टॅग्स पर्याय दिसेल. आम्ही हळूहळू इतर निर्मात्यांना टॅगिंगचे फिचर्स आणण्यास सुरुवात करणार आहे. यूट्यूबच्या या फीचरची चर्चा यापूर्वीच झालीये.


युझर्सना कमाईचे नवा मार्ग


YouTube ने त्याच्या प्लॅटफॉर्मवर निर्मात्यांसाठी उत्पन्न होण्याचा एक स्त्रोत जोडलाय. कंपनीने शॉर्ट व्हिडिओंवर जाहिरातींचे फीचर देखील जोडलंय. ज्यामध्ये व्हिडिओ निर्मात्यांना 45 टक्के मिळणार आहे. त्यामुळे आता जवळपास सर्वच व्हिडिओ प्लॅटफॉर्म्सना टिकटॉककडून मोठं आव्हान मिळतंय.