मुंबई : इंटरनेट म्हणजे माहितीचे कोठार. त्यातही युट्यूब म्हणजे तर दृकश्राव्य माध्यमाचा खजिनाच. पण, धोका असा की, युट्बवर असलेल्या व्हिडिओवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. त्यामुळे अनेकदा चांगल्या व्हिडिओसोबत नको असलेले चुकीची माहिती देणारे, अश्लिल व्हिडिओही मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे मुलांना यापासून रोखायचे कसे हा प्रश्न अनेक पालकांच्या मनात आहे. पण, घाबरू नका...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युट्यूबर तुम्हाला नको असलेला आणि मुलांनी पाहू नये असा कंटेट जर दूर ठेवायचा असेल तर, युट्यूबने तशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बालकांच्या हक्क आणि सुरक्षेबाबत युट्युबने नुकतेच एक धोरण जाहीर केले. त्यानुसार युट्यूबवर चुकून किंवा अहारी जाऊन चुकीची माहिती पाहणाऱ्या किंवा पहावी लागणाऱ्या मुलांना दूर ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे. जेव्हा कोणी युट्यूबवर काही व्हिडिओ अपलोड करतील तेव्हा युट्यूबची पॉलिसी टीम त्या व्हिडिओचा अभ्यास करतील.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यूजरने जर आपल्या यूजर आयडीवरून संबधीत व्हिडिओवर आक्षेप घेतला तर, युट्यूब किड्स अॅप्लीकेशनवर तो व्हिडिओ ब्लॉक केला जाईल.
युट्यूब किड्स अॅपवर कंटेट कस्टमाईजही करता येणार आहे. मात्र, सध्यातही ही सुविधा काही देशांपूरतीच मर्यादीत आहे. ज्याद्वारे यूजर्स युट्यूबवरचे व्हिडिओ ब्लॉक करू शकतील. कंपनीने असेही स्पष्ट केले आहे की, जेव्हा व्हिडिओ किंवा संबंधीत चॅनल ब्लॉक केले जाईल तेव्हा यूजर साईन इन असताना युट्यूब किड्स अॅपवर हे व्हिडिओ दिसणार नाहीत. सध्या हे अॅप जगभरातील 37 देशांमध्ये कार्यरत आहे.