YouTube New Feature Zoom In Zoom Out: प्रत्येकाच्या हातात आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो. या स्मार्टफोनमध्ये युट्यूब नसेल असं होऊच शकत नाही. सर्वजण युट्यूबचा (YouTube) सर्रास वापर करतात. जगामध्ये 2 अब्जहून अधिक युट्यूबचा वापर करतात. युट्यूब गुगलनंतर (Google) सर्वात जास्त वापरलं जाणारं सर्च इंजिन आहे. अनेकांनी या युट्यूबच्या माध्यमातून आपलं करिअर घडवलं आहे. युट्यूबची सुरुवात 14 फेब्रुवारी 2005 पासून झाली. त्यानंतर युट्यूबमध्ये अनेक बदल होत गेले. युट्यूबने युजर्ससाठी व्हिडिओ झूम इन आणि झूम आउट फीचर जारी करत आहेत. यूट्यूब युजर्संना त्यांच्या iOS किंवा Android डिव्हाइसवर व्हिडीओ झूम इन आणि झूम आउट करण्यास परवानगी देईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“आम्ही एक फेसलिफ्ट आणि फीचर सादर करत आहोत जे वापरकर्त्यांना व्हिडिओ पाहण्याच्या पद्धतीत सुधारणा केली आहे. युजर्संना अधिक आधुनिक आणि इमर्सिव्ह अनुभव देईल. पण काळजी करू नका, तुम्‍हाला माहीत असलेला YouTube आणि प्रेम अजूनही आमच्या केंद्रस्थानी आहे.'” असं कंपनीने एका ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे. 


ज्येष्ठ नागरिकांसाठी बेस्ट Smartphone! किंमत 7 हजार रुपयांच्या आत, फीचर्स वाचून व्हाल खूश


युट्यूबचे चीफ प्रोडक्ट ऑफिसर नील मोहन यांनी लिहिले की, 'YouTube ने या वर्षाच्या सुरुवातीला 17 वा वाढदिवस साजरा केला आणि आम्हाला आश्चर्य वाटले की आता थोडासा बदल करण्याची वेळ आली आहे ? म्हणून आम्ही जगभरातील हजारो दर्शकांकडून इनपुट गोळा केले आणि त्यानुसार काही बदल केले'