World Biggest IPhone: जर एखाद्या व्यक्तीकडे iPhone 12 Mini असेल आणि त्याने   अचानक iPhone 14 Pro Max वापरण्यास सुरुवात केली तर त्याचा अनुभव नक्कीच आश्चर्यकारक असेल.  iPhone 14 Pro Max मध्ये  मोठी स्क्रीन, दीर्घ बॅटरी आणि उत्तम कॅमेरा आहे. त्यामुळे युजरला मोठ्या स्क्रीनवर सोशल मीडिया, मेसेजिंग आणि कंटेंट पाहण्याचा चांगला अनुभव मिळतो. पण प्रो मॅक्सपेक्षा मोठा आयफोन असेल का? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?  प्रो मॅक्सच नव्हे तर एखाद्या मनुष्याच्या ऊंचीएवढा आयफोन तुम्हाला पाहता येणार आहे. एका YouTuber ने जगातील सर्वात मोठा iPhone तयार केला   असून हा   6 फूट इतका उंच आहे. विशेष म्हणजे हा सर्वसाधारण  iPhone सारखाच काम करतो


जगातील सर्वात मोठा आयफोन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकप्रिय युट्यूबर मॅथ्यू बीम आपल्या चॅनलवर मजेदार कंटेन्ट तयार करत असतो. गेल्या काही दिवसात त्याचे व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. आणि त्याच्या नव्या व्हिडिओनेही खळबळ उडवली आहे. त्याने 'मी जगातील सर्वात मोठा आयफोन बनवला आहे' नावाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. जगातील सर्वात मोठा आयफोन प्रत्यक्षात बनवण्यात तो यशस्वी झाला आहे



त्यांचा हा आयफोन सर्वसाधारणपणे 2 मीटर उंच आहे. पण हा खरा आयफोन नाही. हे टेलिव्हिजनसाठी वापरले जाणारे एक डिस्प्ले टच पॅनेल आहे. टीव्ही मॅक मिनीमध्ये आयफोनप्रमाणे सर्व अॅप्स आणि फंक्शन्स चालतात.


यामध्ये सेल्फी घेण्यापासून टायमर सेट करता येतो आणि त्यासोबत  Apple Pay वापरून खरेदी करण्याची सुविधा आहे. YouTuber मॅथ्यू बीम हा iPhone घेऊन न्यूयॉर्क शहरात फिरत असतो, या iPhone सोबत कधी तो सेंट्रल पार्कमध्ये फिरतो, कधी सबवे तर कधी MKBHD स्टुडिओला भेट देतो.