Thane Crime : ठाण्यात वडिलांच्या मदतीने अल्पवयीन मुलाने त्याच्या 22 वर्षीय गर्लफ्रेंडची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी आणि त्याच्या मित्राला थेट बिहारमधून अटक केली आहे. तर मुलाचे वडील अद्याप फरार असून ठाणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला ही हत्या कशासाठी झाली याचा उलघडा होत नव्हता. मात्र पोलिसांनी सखोल तपास करुन या प्रकरणाचा छडा लावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाणे जिल्ह्यात एका 16 वर्षाच्या मुलाने त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या केली. या घटनेत मुलाचे वडील आणि अन्य एक व्यक्ती आरोपीचा समावेश आहे. पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी आरोपी मुलाचे वडील फरार आहेत. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांनी सांगितले की, 27 ऑक्टोबर रोजी हाजी मलंग हिल्सजवळील रेल्वे रुळाजवळ सुमारे 22 वर्षांच्या अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला होता.


27 ऑक्टोबर रोजी हाजी मलंग डोंगराजवळील रेल्वे रुळाजवळ एका 22 वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला होता. सुरुवातीला दोरीने गळा आवळून तरुणीचा खून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झालं होतं. मात्र या तरुणीची ओळख पटत नव्हती. पोलिसांनी सखोल तपास करत तरुणीची ओळख पटवली असता ती उल्हासनगर येथील असल्याचे समोर आलं. पोलिसांनी आणखी तपास केला असता तिचे एका अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध असच्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करत आरोपी मुलाला बिहारमधून ताब्यात घेतलं.


पोलिसांच्या चौकशीत अल्पवयीन मुलाने सगळा प्रकार सांगितला आहे. अल्पवयीन मुलाचे आणि 22 वर्षीय तरुणीचे प्रेमसंबंध होते. याबद्दल माहिती मुलाच्या कुटुंबियांनी मिळाली होती. कुटुबियांनी याचा विरोध केला. त्यामुळे अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या वडिलांसह त्यांच्या मित्राने तरुणीला संपवण्याचा कट रचला.


25 ऑक्टोबर रोजी झालेल्या वादातून मुलीचा अल्पवयीन प्रियकर, प्रियकराचे वडील आणि अन्य एका व्यक्तीने मिळून मुलीची हत्या केली होती. आरोपींनी खून करून तरुणीचा मृतदेह फेकून दिला होता. या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन व त्याच्या साथीदाराला 7 नोव्हेंबर रोजी बिहारमधून अटक केली होती. अल्पवयीन मुलीचे वडील अद्याप फरार आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.