Video : क्रूरतेचा कळस! वृद्ध सासूला सुनेकडून अमानुष मारहाण, ठाण्यातील धक्कादायक घटना
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यात सून आपल्या वृद्ध सासूला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे.
Thane Crime Viral Video : घरात माणसं असली की वादावादी भांडणं होणारच. भांड्याला भांड लागणारच ना, अशी मराठी म्हणं आहे. सासू सुनचं ही तसंच आहे. प्रत्येक घरात सासू सुनेचे अनेक वाद आपण ऐकलीच असतील. काळ बदला आहे, पूर्वीसारखी सासू सुनेचे नातं राहिलं नाही. पण आजही काही घरांमध्ये सासू सुनेचं भांडण काही नविन नाही. पण सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक महिला दुसऱ्या महिलेला अमानुष प्रकारे मारहाण करताना दिसत आहे. (thane Crime news Daughter in law brutally beaten mother in law cctv video viral Social media trending now)
क्रूरतेचा कळस!
शाब्दिक वादावादीपर्यंत ठिक आहे, पण मारहाण करणे हे क्रूरता आहे. या व्हिडीओमध्ये सून सासूला मारहाण करत आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फूटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सून तिच्या वृद्ध सासूला निर्दयीपणे मारताना दिसत आहे. सासू हॉलमधील सोफ्यावर बसली असताना सून तिला घरातून निघून जा म्हणून वारंवार म्हणत आहे. या दोघांमध्ये शाब्दिक वादावादी सुरु असताना सूनेचा राग अनावर होतो आणि ती सासूला सोफ्यावरुन खाली खेचते.
त्यापूर्वी ती घराचा मुख्य दरवाजा उघडते आणि तिला या घरातून जाण्यास सांगते. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे अमानुष कृत्य सुरु असताना त्या घरात या दोन महिलांशिवाय अजून एक महिला किचनमध्ये काम करताना दिसत आहे. कदाचित ती महिला त्या घरातील कामवाली असू शकते. तरीदेखील ती महिला या प्रकारात काहीही हस्तक्षेप करताना दिसत नाही.
ही धक्कादायक घटना ठाणे पूर्वमधील सिद्धार्थनगर कोपरीमधील आहे. तर मारहाण करणाऱ्या महिलेचं नाव कोमल ललित दयारामणी असून तिचं वय 53 वर्ष आहे. कोमल या इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, कापूरबावडीला कामावर आहेत.
या घटनेचा व्हिडीओ सामाजिक कार्यकर्ते Binu Varghese यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील x वरील अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे. झी 24 तासने Binu Varghese यांच्याशी संपर्क साधला असताना असं कळलं की, त्या वृद्ध महिलेच्या नातेवाईकाने हा व्हिडीओ सामाजिक कार्यकर्त्याला दिला. पोलीस या संदर्भात तक्रार नोंदवून घेत नाही म्हणून त्यांनी मदत मागितली. म्हणून सामाजिक कार्यकर्ते यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यात ठाणे पोलिसांना टॅग केलं.
ठाणे पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून त्यांनी या प्रकरणात तक्रार नोंदवून घेतली आहे. झी 24 तासने ठाणे पोलिसांनी संपर्क साधल्यावर या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली. पोलिसांनी सांगितलं की, नवरा बायकोमध्ये वाद सुरु आहे. राहत्या घरावरुन त्यांच्यामध्ये भांडण सुरु आहे. सासू आणि मुलगा सुनेला घरातून निघून जाणा म्हणून वारंवार सांगत होते.
म्हणून नवरा घरात नसताना सूनेने संधी साधली आणि सासूला घरातून बाहेर काढण्यासाठी तिने सासूला मारहाण केली. तर सासूचं वय हे 70 वर्ष एवढं आहे.