पहिल्या वेळेस मुलगी पाहून पसंत म्हणाला, ५ व्या वेळेस म्हणाला मुलीत इथं बिघाड...मग काय...
मुलाच्या त्या निर्णयामुळे मुलीच्या नातेवाईकांनी मुलाला खोलीत बंद करून चांगलाच चोप दिला.
बुलढाणा : जिह्यातील नांदुरामधील आलमपूर मुलगी पहायला आलेल्या मुलाची जबर धुलाई करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गावातील एका मुलीला लग्नासाठी स्थळ आले होते.
मुलीला पाहायला आलेल्या मुलगा 1-2 नाही तर 5 वेळा मुलीला पहायला आला. शेवटी लग्नाला नकार दिला. मुलाच्या या निर्णयामुळे मुलीच्या नातेवाईकांनी मुलाला खोलीत बंद करून चांगलाच चोप दिला.
मुलीच्या डोळ्यात व्यंग असल्यावरून लग्नाला नकार
संबधित मुलगा चारवेळा आपल्या नातेवाईकांसोबत आणि मित्रांसोबत मुलीच्या घरी पहायला गेला होता. पहिल्यांदा त्याला मुलगी पसंत होती. त्यानंतर त्यांच्यात टीळा देखील झाला. त्यानंतर लग्नाच्या मुहूर्तावरून पाचव्यांदा मुलगा नातेवाईकांसोबत मुलीच्या घरी गेला. त्यावेळी त्याचे मत बदलले.
आता त्याला मुलीच्या डोळ्यात व्यंग वाटू लागले. त्यानंतर त्याने मुलीशी लग्न करण्यास नकार दिला. लग्नाच्या निमित्ताने मुलाच्या नखऱ्यांनी वैतागलेल्या मुलीच्या नातेवाईकांनी त्याला बंद खोलीत चांगलाच चोप दिला.
मुलीच्या कुटूंबियांनी दरवेळी चांगला पाहुंचार केला
मुलाच्या निर्णयानंतर मुलीच्या कुटूंबियांनी इतका संताप केला की, त्याला गाडीत बसेपर्यंत मारहाण केली. गावातील अन्य लोकांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला परंतु मुलीच्या नातेवाईकांचा मुलाला चोप सुरूच ठेवला.
मुलगा अकोला जिह्यातील होता. ज्या ज्या वेळी तो मुलीच्या घरी तिला पाहायला येत असे त्या त्या वेळी मुलीच्या कुटूंबियांनी त्याचा चांगला पाहुंचार केला होता.