भाजप `त्या` जागांवर OBC उमेदवारच देणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठी निवडणूका थांबवता येणार नसल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राज्यातील भाजपने महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले आहे.
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासाठी निवडणूका थांबवता येणार नसल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राज्यातील भाजपने महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले आहे.
'महाविकास आघाडीचा एक गट सक्रीय होता ज्याने OBC आरक्षणाचा अगोदरपासून विरोध केला. काही झारीतील शुक्राचार्य होते ज्यांनी OBC आरक्षण होऊ दिले नाही'. अशी घणाघाती टीका माजी मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
हेही वाचा : कोणत्या विषयाचे राजकारण करायचे याचे भान ठेवायलाच हवे; शिवसेनेचे टीकास्त्र
4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. त्यानंतर 3 महिन्यात डेटा तयार करता आला असता. मात्र या सरकारने OBC आरक्षण घालवले. भाजप निवडणुकीत OBC जागेवर OBC उमेदवारच देईल. महाविकास आघाडीने OBC समाजाचा घात केला आहे. OBC समाज त्यांना सोडणार नाही. असा इशाराही बावनकुळे यांनी सरकारला दिला आहे.
महाविकास आघाडीचा एक गट सक्रीय होता त्याने OBC आरक्षणाला आधीपासून विरोध दर्शवला होता. हे झारीतील शुक्राचार्य होते ज्यांनी ठरवून OBC घालवले. अशी टीका बावनकुळे यांनी केली.