नागपूर: ब्राम्होस क्षेपणास्त्र तंत्रज्ञान प्रणालीची हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेला निशांत अग्रवाल हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्याची पोस्ट सोशल मीडियावर हेतुपुरस्सर पसरवीत असल्याच्या आरोप करण्यात आला आहे.  याविरोधात नागपूरात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


बालरतन फुले या नावाच्या तसेच इतर काही फेसबुक अकाऊंटवरून निशांत अग्रवाल हा संघाचा स्वयंसेवक असल्याची माहिती पसरवण्यात आली होती. निशांतचा संघाशी काहीएक संबंध नाही. मात्र, फुले याच्या पोस्टमुळे संघाची बदनामी होत आहे. याविरुद्ध महाल येथील मोहिते शाखेच्या स्वयंसेवकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 


निशांत अग्रवाल गेल्या चार वर्षांपासून ब्राह्मोस ऐरोस्पेसमध्ये सिस्टम इंजिनिअर म्हणून काम करीत होता. तो ४० जणांच्या टीमचे नेतृत्व करायचा. उत्तर प्रदेश पोलिसांनी सुमारे दीड महिन्यांपूर्वी बीएसएफचा जवान अच्युतानंद मिश्राला अटक केल्यावर निशांत अग्रवालचे नाव समोर आले होते.