नागपूर: समाजातील सज्जन शक्ती आपापल्या परीने देशाला विश्वगुरु बनवण्यासाठी योगदान देत आहेत. देशात समाजहिताच्या अनेक गोष्टी सुरळीत सुरु आहे. परंतु त्याकडे कुणाचे फारसे लक्ष जात नसल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपुरातील ऐका कार्यक्रमात ते बोलत होते. 


यावेळी भागवत यांनी म्हटले की, सामाजिक संवेदना जपणे ही गरज असून त्यासाठी सामूहिक योगदान क्रमप्राप्त ठरते. केवळ स्वतःचा विकास न साधता अर्पित होऊनी जावे, हा मूलमंत्र जीवनात उतरवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.