ZP Election 2021 | नागपूरात कॉंग्रेसने गड राखला; राष्ट्रवादीला फटका
नागपूरात कॉंग्रेसने पुन्हा मोठा विजय मिळवला आहे.
अमर काणे, नागपूर : जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी 16 जागा जिल्हापरिषदेच्या तर पंचायत समितींच्या 31 जागावर मतमोजणी सुरू आहे. दुपारी 2 वाजेपर्यंतच्या निकालाचे कल निकाल स्पष्ट करीत आहेत. पोटनिवडणुकीमध्ये कॉंग्रेसने मोठे यश संपादन केले आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या अनुक्रमे 2-1 जागा कमी झाल्या आहेत.
नागपूरात कॉंग्रेसने पुन्हा मोठा विजय मिळवला आहे. नागपूर जिल्हा परिषदेवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. ती कायम ठेवण्यात कॉंग्रेसला यश आले आहे.
नागपूर कॉंग्रेसची मुसंडी
सुनील केदार यांचा झंझावाती प्रचारामुळे काँग्रेसला 2 जागांचा फायदा झाला आहे. आधीच एकहाती सत्ता असलेल्या कॉंग्रेसने आपला गड आणखी मजबूत केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख प्रचारात नसल्याने राष्ट्रवादीला फटका बसल्याचे दिसून आले आहे.
गुमथळा जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अनिल निधान पराभूत झाले आहेत.
आशिष देशमुख यांनी प्रचार केलेले भाजपचे दोन (एकूण 3) उमेदवार विजयी
गोंडवाना गणतंत्र पार्टी एका जागेवर विजयी
-------------------------------
नागपूर -जिल्हा परिषद-58 जागा
रद्द झालेले जिल्हा परिषद सदस्यत्व 16
काँग्रेस - 7
राष्ट्रवादी - 4
भाजप - 4
शेकाप -1
-----
आधीचे पक्षीय बलाबल -
काँग्रेस -- 31
राष्ट्रवादी -- 10
भाजप -- 15
शेकाप -- 1
सेना - 1
निवडणुकीनंतर नवे समीकरण -
जिल्हा परिषद एकूण जागा - 58
काँग्रेस -33 (2 फायदा)- आता 9 जागांवर विजयी
राष्ट्रवादी 8 (2 नुकसान)-आता 2 जागांवर विजयी
भाजप - 14 (1 नुकसान)-आता 3 जागांवर विजयी
शेकाप - 1 -(आता 1 जागेवर विजयी)
सेना - 1 -(आता कुठेच जिंकले नाही)
गोगप - 1- (1 फायदा)-आता एका जागेवर विजयी