Video| या शहरात सुरु होणार 5G इंटरनेट सुविधा
Fri, 26 Aug 2022-10:10 am,
5G internet service will start in this city
5G सेवा कधी सुरु होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातलं उत्तर दिलंय. देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय. 5G सेवा सुरू झाल्यानंतर त्याचा देशभरात टप्याटप्यानं विस्तार करण्यात येणारेय. पुढील दोन ते तीन वर्षांत देशभरात 5G सेवा पोहचण्याचं आमचं ध्येय आहे. 5G सेवा सर्वसामान्यांना परवडणारी असेल, याचीही खात्री करू. त्यासाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागांकडे लक्ष देत असल्याचं अश्विनी वैष्णव म्हणाले.