Video| अमित शाह यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं घेतलं दर्शन
Amit Shah visited the lalbaugcha raja with Family मुंबई दौ-यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दौ-याची सुरूवात लालबागच्या राजाच्या दर्शनाने केली. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाह यांचं स्वागत केलं. तिथून शाह आपल्या कुटुंबीयांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचले. अमित शाह यांनी लालबागच्या राजाचं पूजन केलं, बाप्पाच्या चरणांवर डोकं ठेऊन अमित शाह यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं. लालबागमधून अमित शाह आता बांद्र्याकडे रवाना झालेत. तिथे त्यांनी आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशाचं दर्शन घेतलं. तिथून ते उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेटी देणार आहेत. अमित शाहांच्या या दौ-यात मनसेसोबत युतीवर शिक्कामोर्तब होऊ शकतं. शिंदे गटासोबत जागावाटप, मनसेसोबत युतीची चाचपणी, ठाकरे गटाला धोबीपछाड घालण्याची रणनीती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. भाजपने मुंबई मनपात 115 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. मुंबई मनपासह मुंबई परिसरातल्या महापालिका तसंच राज्यातल्या इतर महापालिकांमध्येही भाजपची सत्ता आणण्याचा निर्धार भाजपने केलाय. त्यासाठी अमित शाहांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय.