Video| ब्राम्होस मिसफायर प्रकरणी हवाई दलाईची मोठी कारवाई
Wed, 24 Aug 2022-9:45 am,
Brahmos misfire case 3 indian Air force officers terminated
ब्रम्होस क्षेपणास्त्र मिसफायर प्रकरणात भारताच्या हवाई दलाकडून मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दोषी आढळलेल्या हवाई दलातील तीन अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. क्षेपणास्त्र मिसफायरच्या घटनेनंतर जागतिक पातळीवर त्याचे पडसाद उमटले होते. तसेच पाकिस्तानने घेतलेल्या आक्षेपामुळे भारताने घटनेची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी सुरू केली होती. त्या चौकशीत दोषी आढळलेल्या हवाई दलातील ग्रुप कॅप्टन, विंग कमांडर आणि स्क्वाड्रन लीडर या तीन अधिका-यांना बडतर्फकरण्यात आलंय. मार्चमध्ये भारताचे ब्रम्होस क्षेपणास्त्र एका चुकीमुळे पाकिस्तानात जाऊन कोसळले होते. त्या प्रकरणी हवाई दलाने जबाबदार अधिकार्यांवर कारवाई केली...