Video | एकनाथ शिंदे यांचे मिशन BMC इलेक्शन
Tue, 30 Aug 2022-8:15 am,
Eknath Shindes focus on Mumbai municipal elections
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नियुक्त्या जाहीर केल्यायत. यात मुंबईसाठी 5 विभागप्रमुख तर 3 विभाग संघटकाना पक्ष बांधणी करण्यासाठी जबाबदारी देण्यात आलीय. मुंबईतील शिवसेना पदाधिकारी आणि पक्षाचे नवनियुक्त सचिव आणि आमदार यांच्या उपस्थितीत काल मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईसाठी काही चेह-यांकडे महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली. या सर्व विभागप्रमुख आणि विभाग संघटकाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. या सर्व जणांना पक्षविस्ताराचं काम सुरू करण्यास सांगण्यात आलंय. ((याआधी आमदार प्रकाश सुर्वे यांची मागाठाणे विधानसभा विभागप्रमुखपदी तर आमदार दिलीप लांडे यांची घाटकोपर-असल्फा विधानसभा विभागप्रमुखपदी तर माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांची भायखळा विधानसभा मतदारसंघात विभागप्रमुखपदी नियुक्ती केल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर नव्यानं या नियुक्त्या जाहीर झाल्यानं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील