सातारा । खटाव तालुका दुष्काळी यादीतून गायब
Wed, 17 Oct 2018-8:05 pm,
सातारा : जिल्ह्यातला खटाव दुष्काळी तालुका म्हणून जाहीर करावा, या मागणीसाठी विविध संघटनातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावात शोलेस्टाईल अंदोलन केले. खटाव तालुक्यातील 144 गावांपैकी 119 गावांमध्ये पाणी टंचाईचे सावट आहे. असे असताना शासनाच्या अधिकाऱ्यांनी केलेला अहवाल हा खोटा असून त्यामुळे खटाव तालुका दुष्काळी तालुक्याच्या यादीतून गायब झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आज शोले स्टाईल अंदोलन केले.