मुंबई । राम मंदिरापूर्वी बाळासाहेबांचे स्मारक पूर्ण करा - राणे
Fri, 19 Oct 2018-7:15 pm,
मुंबई : अयोध्येत राम मंदिर उभारण्यावरुन राजकारण सुरु झालेय. भाजपने सत्तेत आल्यास राम मंदिर उभारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, राम मंदिरबाबत बोलायला भाजप तयार नाही. यावरुन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप टीका केली. तुम्ही मंदिर बांधताय का, की आम्ही बांधू, असे उद्गार काढले. यावरुन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांनी टोला लगावलाय. राम मंदिरापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक पूर्ण करा, राणेंनी टोला हाणला.