नाशिक । शहरात पाणीकपात लागू - महापौर
Sat, 22 Jun 2019-4:05 pm,
नाशिक शहरात पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. महापौर रंजना भानसी यांनी हे आदेश दिले आहेत. पाऊस लांबल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचे त्या म्हणाल्यात. गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीकपात लागू करण्यात आली आहे. गंगापूर धरणाची पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे फक्त एकवेळ पाणीपुरवठा तिथेही कपात केली जाणार आहे.