नाशिक । लासलगाव एसटी बसस्थानकावर महिलेला भरदिवसा जाळले
Sat, 15 Feb 2020-6:50 pm,
नाशिक : वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांडाच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आता नाशिकच्या लासलगाव एसटी बसस्थानकावर एका महिलेला भरदिवसा जाळण्यात आले. चार ते पाच जणांनी या महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटविले. ही महिला ४० टक्के भाजली असून तिला लासलगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला उपचारासाठी नाशिकला हलवण्यात येत आहे.